मुंबई : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होत असताना, मध्य रेल्वेने या हल्ल्यात प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे झालेल्या या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि निष्पाप प्रवाशांचे मध्य रेल्वेने स्मरण केले.
26 नोव्हेंबर 2026 रोजी CSMT येथील शहीद स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त राहुल राज आणि CSMT चे स्टेशन डायरेक्टर चंद्रकांत पगारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मध्य रेल्वेचे इतर अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/11/26/panvel-municipal-corporation-announces-weekly-day-long-water-cuts-across-areas-from-23rd-november-amid-low-dam-reserves/
आरपीएफ श्वान पथक आणि बीडीडीएसची उपस्थिती
या कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) श्वान पथकाने आणि बॉम्ब शोधक व निकामी करणाऱ्या पथकाने (BDDS) देखील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आरपीएफ बँडने देशभक्तीपर धून सादर केल्या. या वेळी उपस्थितांनी देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या धैर्याचे आणि त्यागाचे स्मरण केले.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्धता
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांसह सुरक्षा दलातील जवानांनी प्राण गमावले होते. CSMT हे या हल्ल्यातील प्रमुख लक्ष्यांपैकी एक होते. या हल्ल्यातील हुतात्म्यांचे स्मरण करत मध्य रेल्वेने रेल्वे प्रवासी आणि रेल्वे परिसराच्या सुरक्षेसाठी आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली.