काही दिवसांतच नमित मल्होत्राच्या ‘रामायण’ चित्रपटाला थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण होईल आहे चित्रपटाच्या जगभरातील एकूण कमाईने १,७५० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. निर्मात्यांनी दिग्दर्शक नितेश तिवारी, रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नमित मल्होत्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुष्पगुच्छ दिला तर नितेश तिवारी यांनी त्यांना शाल भेट दिली. ‘वर्ल्ड ऑफ रामायणा’ च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने आज हे फोटो शेअर केले. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘रामायण’ (Ramayana) टीमला गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा बहुमान मिळाला. हा चित्रपट देशभरात आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळवत आहे.’
अमित शाह यांच्या भेटीत साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा खास लूक
साई पल्लवी गृहमंत्र्यांच्या कार्यालयात एका मोहक रूपात दिसल्या. तिने नक्षीकाम असलेली आणि पातळ हिरवी किनार असलेली फ्लेमिंगो गुलाबी रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्रीने हातात सोनेरी बांगड्या आणि गळ्यात टेम्पल ज्वेलरी परिधान केली होती. अभिनेत्रीने मेकअप देखील एकदम हलका केला होता. न्यूड पिंक रंगाच्या लिपस्टिकने तिचा हा लूक परिपूर्ण दिसत होता. रामायण टीमसोबत प्रभू रामाची भूमिका साकारणारा रणबीर कपूरदेखील होता. सूट, टेलर्ड पंत आणि तपकिरी रंगाचे शूज यामध्ये तो खूपच आकर्षक दिसत होता. अभिनेत्याने स्टड्स, लाल रंगाचा छोटा रुमाल, पारदर्शक चष्मा आणि घड्याळ घालून आपला लूक पूर्ण केला.
View this post on Instagram
रामायण बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘रामायण: भाग १’ ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याने अनेक विक्रम मोडले आलेत. २१ दिवसांनंतर चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ,७५५.६० कोटी रुपये झाली आहे, तर भारतातील निव्वळ कमाई १,००० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. नमित मल्होत्रा दिग्दर्शित हिंदू महाकाव्यावर आधारित चित्रपट हा जगभरात १५०० कोटी रुपये कमावणारा आणि भारतात १००० कोटी रुपयांच्या निव्वळ कमाईच्या जवळ पोहोचणारा सर्वात वेगवान भारतीय चित्रपट ठरला आहे. तसेच या चित्रपटाने १९६ कोटी रुपयांची कमाई करत भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा दुसरा विकेंड नोंदवला आहे. दरम्यान, चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ च्या दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होणार असून यातील कलाकारांमध्ये साई पल्लवी, रणबीर कपूर, रवी दुबे, सनी देओल, शिबा चड्ढा, यश, काजल अग्रवाल, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंग यांचा समावेश आहे.