Home ताज्या घडामोडी Aata Hou De Dhingana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या प्रेक्षकाला सोन्याची भेट! पुण्याच्या श्रीदेवींनी जिंकले 1 तोळ्याचे नाणे

Aata Hou De Dhingana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या प्रेक्षकाला सोन्याची भेट! पुण्याच्या श्रीदेवींनी जिंकले 1 तोळ्याचे नाणे

0
Aata Hou De Dhingana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या प्रेक्षकाला सोन्याची भेट! पुण्याच्या श्रीदेवींनी जिंकले 1 तोळ्याचे नाणे
'धिंगाणा'मुळे सोन्याचं स्वप्न पूर्ण! पुण्याच्या श्रीदेवी यांनी जिंकले १ तोळ्याचे नाणे

Aata Hou De Dhingana: स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या धिंगाणेबाज कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या घराघरांत आनंद आणि विरंगुळ्याचे क्षण पोहोचवले आहेत. या कार्यक्रमाच्या पाचही पर्वांना प्रेक्षकांनी आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्टार प्रवाहने सर्वोत्कृष्ट धिंगाणेबाज प्रेक्षक निवडण्याची एक खास स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्याच्या श्रीदेवी लालसंगी यांनी बाजी मारत एक तोळ्याचं सोन्याचं नाणं जिंकण्याचा मान मिळवला.

https://www.prahaar.in/2026/11/26/yogi-adityanath-takes-a-dig-at-the-opposition-over-the-red-book-launches-a-sharp-critique-on-constitution-day/

‘आता होऊ दे धिंगाणा’च्या आठ आठवड्यांमध्ये विचारण्यात आलेल्या आठ प्रश्नांची अचूक उत्तरं देत प्रेक्षक वर्गातून श्रीदेवी यांनी आपल्या आवडत्या कार्यक्रमाशी असलेलं नातं आणि त्यावरील प्रेम सिद्ध केलं आहे. त्यांच्या या उत्साहाला आणि सहभागाला मिळालेली ही सोनेरी भेट त्यांच्या आनंदात भर घालणारी ठरली. कार्यक्रमाचा धिंगाणेबाज होस्ट सिद्धार्थ जाधव याच्या हस्ते श्रीदेवी यांना सोन्याचं नाणं देण्यात आले. ते स्वीकारताना त्या भावूक झाल्या. आपल्या आवडत्या कार्यक्रमामुळे मिळालेला हा अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी केवळ बक्षीस नसून, स्टार प्रवाहसोबत जोडलेल्या आनंदाच्या आठवणींची अनमोल भेट ठरली. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेकदा ठरवूनही सोनं खरेदी करणं शक्य झालं नाही. मात्र आता होऊ दे धिंगाणामुळे हे स्वप्न सत्यात उतरल्याची भावना श्रीदेवी यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रेक्षक आणि वाहिनी यांचं नातं हे केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित न राहता त्यात भावनांचा, आपलेपणाचा आणि असंख्य आठवणींचा धागा गुंफलेला असतो. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या माध्यमातून स्टार प्रवाहने प्रेक्षकांच्या या प्रेमाला एका खास भेटीच्या रूपात दिलेली ही पोचपावती आहे.

होऊ दे धिंगाणा हा कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कलाकारांची धमाल, अनपेक्षित खेळ, टास्कमधला थरार आणि खळखळून हसवणारे क्षण यामुळे हा कार्यक्रम घराघरात पोहोचला. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याने आपल्या भन्नाट शैलीत, उत्स्फूर्त विनोदाने आणि जबरदस्त एनर्जीने ‘आता होऊ दे धिंगाणा’चे पाचही पर्व अव्वल स्थानी नेऊन ठेवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here