Home ताज्या घडामोडी Pankaj Tripathi: मराठी नाटकाच्या प्रेमात पंकज त्रिपाठी! ‘एक तिची गोष्ट’ला म्हणाले ‘अद्भुत’

Pankaj Tripathi: मराठी नाटकाच्या प्रेमात पंकज त्रिपाठी! ‘एक तिची गोष्ट’ला म्हणाले ‘अद्भुत’

0
Pankaj Tripathi: मराठी नाटकाच्या प्रेमात पंकज त्रिपाठी! ‘एक तिची गोष्ट’ला म्हणाले ‘अद्भुत’
मराठी नाटकाच्या प्रेमात पंकज त्रिपाठी!

मुंबई: सध्या मराठी मनोरंजन विश्वाला चांगले दिवस आले असून एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच मराठी रंगभूमी ही प्रेक्षकांची माने जिंकत आहे. सध्या वेगवगेळ्या धाटणीची नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकांची भुरळ मराठी कलाकारांनाच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांनाही पडत आहे.

मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या एका अनोख्या प्रयोगांची दखल बॉलिवूडमधील कलाकार ही घेत आहेत. ‘एक तिची गोष्ट’ हे नाटक सध्या चर्चेत आहे. नुकताच या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग पार पडला. या खास प्रयोगाला हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी उपस्थिती लावली.

नृत्य, अभिनय आणि भावनांच्या माध्यमातून सादर झालेल्या या कलाकृतीने पंकज त्रिपाठी यांचे लक्ष वेधून घेतलं. प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी संपूर्ण सादरीकरणाचं कौतुक करत ‘अद्भुत’ अशा शब्दांत कलाकारांना दाद दिली. हिंदी सिनेसृष्टीतील अशा प्रतिभावान कलाकाराकडून मिळालेली ही शाबासकी म्हणजे ‘एक तिची गोष्ट’च्या संपूर्ण टीमसाठी मोलाची पावतीच असल्याचं कलाकरांनी यावेळी सांगितले.

https://www.prahaar.in/2026/11/26/you-gave-me-the-identity-of-a-mother-genelias-emotional-post-on-riaans-birthday-riteishs-post-also-draws-attention/

मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स आणि पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मीतीने साकारलेल्या ‘एक तिची गोष्ट’ने यशस्वी 25 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. विराजस कुलकर्णी लिखित या नृत्यनाट्याचं दिग्दर्शन सूरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी केलं आहे. गौरी कालेलकर-चौधरी, सिद्धेश चौधरी आणि फुलवा खामकर यांची निर्मिती असलेल्या या नृत्यनाट्यात प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची कन्या आस्मा खामकर,ओमकार गोखले यांच्या कलाविष्काराचा कलानुभव रसिकांना या प्रयोगाच्या माध्यामातून अनुभवायला मिळतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Batamiwala (@marathi_batamiwala)

हे नाटक म्हणजे सकारात्मकतेची नवी ऊर्जा देत आयुष्याला नव्या रंगांनी, नव्या ऊर्जेने सजवणारा एक अनोखा अनुभव अशा शब्दांत अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी नाटकाचं भरभरून कौतुक केलं आहे. “संपूर्ण प्रयोग फॅन्टास्टिक होता!” अशा शब्दांत बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर यांनी नाटकाला भरभरून दाद दिली.

25 व्या प्रयोगाला मिळालेली बॉलीवूड कलाकारांकडून ही कौतुकाची थाप ‘एक तिची गोष्ट’ च्या कलाकारांसाठी नक्की आनंदाची बातमी आहे. या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर, उर्मिला कानिटकर, मनवा नाईक, स्मिता तांबे, शर्वरी पाटणकर, उमेश जाधव, सुशांत शेलार, मृणाल देशपांडे, दीपा चौधरी, सुखदा खांडकेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here