Home क्रीडा केन विल्यमसन आता थेट मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत; SA20 मध्ये नवी इनिंग!

केन विल्यमसन आता थेट मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत; SA20 मध्ये नवी इनिंग!

0
केन विल्यमसन आता थेट मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत; SA20 मध्ये नवी इनिंग!
केन विल्यमसन आता थेट मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत (Photo: ANI)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन विल्यमसनने आता एका नव्या आणि थक्क करणाऱ्या भूमिकेत पाऊल ठेवले आहे. 2027 च्या SA20 हंगामासाठी डर्बन सुपर जायंट्स (DSG) संघाने केन विल्यमसनची नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे विल्यमसन खेळाडूवरून थेट प्रशिक्षक म्हणून पदार्पण करणार असून, कोणत्याही क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची त्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसेनर यांची जागा आता केन विल्यमसन घेतील. 2023 मध्ये SA20 लीगच्या पहिल्या हंगामापासून क्लुसेनर डर्बन सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, आगामी 2027 च्या हंगामासाठी फ्रँचायझीने मोठ्या बदलाची घोषणा करत विल्यमसनवर संघाची धुरा सोपवली आहे.

विशेष म्हणजे, केन विल्यमसन यापूर्वी याच संघाकडून मैदानावर खेळला आहे. त्याने 2025 आणि 2026 च्या हंगामात डर्बन सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करताना 15 सामन्यांमध्ये 343 धावा केल्या होत्या. फ्रँचायझीने त्याला आगामी हंगामासाठी खेळाडू म्हणून कायम ठेवले होते, पण आता त्याच्यावर डगआउटमधून संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

फ्रँचायझीच्या मते, विल्यमसनकडे दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव, खेळाची सखोल समज आणि सर्वोच्च स्तरावर कर्णधारपद सांभाळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघाला सातत्यपूर्ण कामगिरीची आणि विजेतेपदाची संधी अधिक भक्कम होण्याची अपेक्षा डर्बन सुपर जायंट्सला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/25/acc-mens-asia-cup-rising-stars-2026-india-to-face-sri-lanka-in-the-semi-finals/

नव्या भूमिकेत केन विल्यमसन हा अनुभवी सपोर्ट स्टाफसोबत काम करेल. संघाच्या क्रिकेट संचालकपदी टॉम मूडी कायम राहतील. त्यांच्यासोबत रायन कुक फलंदाजी प्रशिक्षक, भरत अरुण वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक, कार्ल क्रो फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आणि कुशन किशन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतील. खेळाडू म्हणून अनेक संस्मरणीय खेळी साकारल्यानंतर, प्रशिक्षक म्हणून केन विल्यमसन डर्बन सुपर जायंट्सला कोणती नवी दिशा देतो, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here