Home ताज्या घडामोडी ‘तू मला आई ही ओळख दिलीस…’ रियानच्या वाढदिवशी जेनेलियाची भावुक पोस्ट! रितेशची पोस्टही चर्चेत

‘तू मला आई ही ओळख दिलीस…’ रियानच्या वाढदिवशी जेनेलियाची भावुक पोस्ट! रितेशची पोस्टही चर्चेत

0
‘तू मला आई ही ओळख दिलीस…’ रियानच्या वाढदिवशी जेनेलियाची भावुक पोस्ट! रितेशची पोस्टही चर्चेत
रियानच्या वाढदिवशी जेनेलियाची भावुक पोस्ट!

Genelia Deshmukh and Riteish Deshmukh Son: बॉलिवूडचं क्युट फेवरेट कपल रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ही जोडी अख्या महाराष्ट्राची आवडती जोडी आहे. रितेश आणि जेनेलिया हे कपल सोशल मीडियात सक्रीय आहेत. नुकताच 25 नोव्हेंबर रोजी रितेश आणि जेनेलिया यांचा मुलगा रियान देशमुख (Riaan Deshmukh) याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या मुलांसोबत त्यांनी काही खास फोटोज शेअर केले आहेत. यावेळी जेनेलिया देशमुख भावूक झाली असल्याचं पाहायला मिळालं. तर, रितेशने सांगितलं की, त्याचा मुलगा त्याला आपला प्रतिस्पर्धी मानतो. सध्या दोघांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

जेनेलिया देशमुखची खास पोस्ट

जेनेलियाने आपल्या पोस्टमध्ये, मला 24 नोव्हेंबरची ती रात्र अजूनही आठवते. मी प्रेग्नेंट होते आणि मला सांगण्यात आले होते की, 25 नोव्हेंबरला बाळ जन्माला येईल. त्या दिवशी नेमके काय होईल हे कळत नव्हतं. त्या रात्री, मी तुझ्या बाबांच्या (रितेश) कुशीत शिरून रडले होते, कारण आई झाल्यानंतर आयुष्य कसे असेल, हे माहित नव्हते आणि मग 25 नोव्हेंबर उजाडली… एक छोटेसे बाळ जन्माला आले आणि त्याचसोबत एका आईचाही जन्म झाला.

https://www.prahaar.in/2026/11/26/amruta-khanvilkar-makes-her-mark-in-the-business-world-alongside-her-acting-career-featured-in-forbes-india/

रियान, हा दिवस माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, हे तुला समजावून सांगता आले असते तर किती बरे झाले असते! पण मला नाही वाटत की मी कधी ते शब्दांत मांडू शकेन. कारण हा माझ्या आयुष्यातील आणि तुझ्या बाबांच्याही आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

25 नोव्हेंबर 2014, माझ्या बाळा, तुला फक्त एवढेच सांगायचे आहे की आयुष्यात काहीही घडो किंवा तू कुठेही असो, मी सदैव तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असेन. तू मला ‘आई’ ही ओळख दिली आहेस आणि आता माझे उर्वरित आयुष्य मी ही भूमिका पूर्ण निष्ठेने निभावण्यात घालवेन.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुख पोस्ट

रितेश देशमुखने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलगा रियानचे काही फोटोज शेअर केले आहेत. यातील काही फोटोज त्याच्या ‘राजा शिवाजी’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानचे आहेत. या सिनेमात रियानने तरुण छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. त्याने फोटो शेअर करत लेकासाठी प्रेमळ कॅप्शन लिहिलं आहे. तर, जेनेलियानेही आपल्या लेकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिने मुलाच्या वाढदिवसानिमित्त काही फोटोज शेअर केले आहेत. तसेच रियानला जन्म दिला, त्या रात्रीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जेनेलिया भावूक झाली असल्याचं पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here