Home ताज्या घडामोडी अभिनयासोबत उद्योगविश्वातही अमृता खानविलकरची भरारी; फोर्ब्स इंडियात नाव

अभिनयासोबत उद्योगविश्वातही अमृता खानविलकरची भरारी; फोर्ब्स इंडियात नाव

0
अभिनयासोबत उद्योगविश्वातही अमृता खानविलकरची भरारी; फोर्ब्स इंडियात नाव

Amruta Khanvilkar: भारताच्या लक्झरी मार्केटमध्ये अनेक कलाकार उद्योजक आपले व्यवसाय करताना दिसत असून अभिनय आणि उद्योग या दुहेरी जवाबदाऱ्या पेलणारे अनेक इंडस्ट्री कलाकार आहेत पण यातलं लक्षवेधी आणि चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर ! फोर्ब्स इंडिया या भारतातील लक्झरी ब्रँड्समधील फाउंडर यादीत अभिनेत्री अमृता खानविलकर हिचे नाव समाविष्ट केले आहे.

नवोदित उद्योजक पुढे येऊन नवे उद्योग सुरू करत असून या उद्योगात नवी दृष्टी घेऊन येत आहेत. काही कलाकारअगदी शून्यापासून ब्रँड उभारत असून फॅशन, वस्त्रोद्योग आणि लाइफस्टाईल या क्षेत्रांमध्ये आज ते स्वतःची वेगळी ओळख संपादन करताना दिसतात, त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर हीचा ब्रँड ‘अमुल्य बाय अमृता’.

https://www.prahaar.in/2026/11/26/akshay-kumar-8-hour-shift-8-hour-shift-makes-producers-waste-akshay-kumar-told-the-real-reason/

2026 मध्ये अमृताने “अमुल्य बाय अमृता” या ब्रॅण्डची स्थापना करून सुरुवात केली आणि अमुल्य हा ब्रँड सुरू होण्याआधीपासूनच तिची या ब्रॅंड सोबत एक भावना होती. जवळपास बारा वर्षांपूर्वी, तिच्या बहिणीच्या लग्नादरम्यान, अमृताला जाणवले की तिच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेकडे कधीही अस्सल हातमागाची पैठणी नव्हती.

अस्सल पैठण्यांच्या शोधातून सुरू झालेला प्रवास तिच्यासाठी विणकर, पारंपरिक कारागिरी आणि प्रत्येक साडीमागील कथांच्या सुंदर जगाची ओळख ठरला. वैयक्तिक कथा व्यवसायांना यशस्वी करतात, कारण त्या ब्रँडला त्याचा उद्देश, प्रामाणिकपणा आणि ओळख देतात, असे तिला वाटते. अमुल्य बाय अमृता मधून तिला सुंदर, अस्सल साड्या शोधण्याचा तोच अनुभव अधिक महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे, असे तिने सांगितले आहे. विणकरांसोबत जवळून काम करून, त्यांची कला समजून घेऊन, आणि खास तरीही सहज परवडणारे कलेक्शन तयार करून. अमुल्य ही अमृताची वैयक्तिक कथा आहे, आणि ती तुमच्या कथेचा भागही व्हावी, अशी तिची इच्छा आहे.

अमुल्य बाय अमृताच्या साड्या या बॉलिवूड मध्ये देखील चर्चेत आहेत काही दिवसांपूर्वी धकधक गर्ल माधुरी दीक्षीत यांनी कोण होणार करोडपती ? साठी अमुल्यचा मराठी साज परिधान केला होता तर ऐकीकडे आगामी बहुचर्चित ईठा या चित्रपटासाठी अमृताचा हा मराठमोळा ब्रॅंड ऑफिशल सारी ब्रॅंड ठरला आहे.

रुपेरी पडदा गाजवून सोबतीला व्यवसाय विश्वात स्वतःची अमुल्य ओळख अमृता संपादन करताना दिसत असून येणाऱ्या काळात अमृता हा ब्रँड जगभर नक्कीच घेऊन जाईल यात शंका नाही !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here