दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांच्यात मंगळवारी फोनवर संवाद झाला. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-जर्मनी संबंध, व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि प्रगत तंत्रज्ञान यांसह विविध जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला. भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात मुक्त व्यापार करार (FTA) झाल्यास द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी नव्या संधी निर्माण होतील, असे दोन्ही नेत्यांनी नमूद केले. ( India Germany Relations)
https://www.prahaar.in/2026/11/24/entrepreneur-in-every-village-scheme-to-be-launched-from-dharashiv-financial-assistance-of-up-to-%e2%82%b91-crore-for-new-entrepreneurs/
व्यापार आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत फ्रेडरिक मेर्झ यांच्यासोबत झालेली चर्चा फलदायी ठरल्याचे सांगितले. यावेळी भारत-जर्मनी सामरिक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यावर चर्चा झाली. ( Narendra Modi)
दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा नेत्यांनी पुनरुच्चार केला. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता व स्थैर्य राखण्यासाठी भारत आणि जर्मनी एकत्र काम करत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Had a productive conversation with Chancellor Friedrich Merz. We reviewed the growing momentum in the India-Germany Strategic Partnership and discussed ways to unlock new opportunities in trade and investment, defence and advanced technologies.
India and Germany will also continue to work closely together to address global challenges and promote peace, stability and a rules-based international order.
@_FriedrichMerz
@bundeskanzler
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2026
भारत-जर्मनी राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण
यंदा भारत आणि जर्मनी आपल्या राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करत आहेत. या महत्त्वाच्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी संरक्षण आणि प्रगत तंत्रज्ञानासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे.
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या विस्तारासाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.
जागतिक घडामोडींवरही विचारविनिमय
या फोनवरील चर्चेत परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा झाली. जागतिक शांतता, स्थैर्य आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
याशिवाय, सध्याच्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध बहुपक्षीय मंचांवर भारत आणि जर्मनी यांच्यातील सहकार्य कायम ठेवण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.