Home देश Notice to Sonia Gandhi: स्वा. सावरकरांचे नातू सत्याकी यांच्याकडून सोनिया गांधींना नोटीस; १५ दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा

Notice to Sonia Gandhi: स्वा. सावरकरांचे नातू सत्याकी यांच्याकडून सोनिया गांधींना नोटीस; १५ दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा

0
Notice to Sonia Gandhi: स्वा. सावरकरांचे नातू सत्याकी यांच्याकडून सोनिया गांधींना नोटीस; १५ दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा
Photo : Prahaar

मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखांवर आक्षेप घेत सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पुस्तकातील काही मजकूर अवमानकारक आणि बदनामीकारक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या नोटिशीला १५ दिवसांत उत्तर न दिल्यास न्यायालयात मानहानीची याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सात्यकी सावरकर यांनी सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ येथील निवासस्थानी टपालाद्वारे नोटीस पाठवली असून, ईमेलद्वारेही ती बजावण्यात आली आहे. सात्यकी यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी याबाबत माहिती दिली. पुस्तकाच्या पान क्रमांक २०१ आणि ४४३ वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/24/amit-shah-and-sukhbir-singh-badal-will-held-press-conference-alliance-likely-possible-in-bjp-and-akali-dal/

स्वातंत्र्यसंग्रामात काँग्रेसचे कार्यकर्ते ब्रिटिशांच्या लाठ्या-काठ्या खात असताना सावरकर ब्रिटिशांसाठी हेरगिरी करत होते आणि त्यांनी ब्रिटिशांना मदत केली, असा उल्लेख पुस्तकात असल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. तसेच भारतात हिंदू धर्म श्रेष्ठ असून अन्य धर्मीय कनिष्ठ आहेत, अशी भूमिका सावरकर यांची होती, असेही पुस्तकात नमूद केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या उल्लेखांमुळे सावरकर यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या पुस्तकातील सावरकरांविषयीच्या उल्लेखांवरून यापूर्वीही राजकीय वाद निर्माण झाला होता. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुस्तकातील मजकुराचा निषेध केला होता. यावेळी प्रवक्त्यांनी पुस्तकाची पाने फाडून निषेध नोंदवला, तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here