मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपारा ते दादर दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या दिव्यांग डब्यात झोपलेल्या एका व्यक्तीला सहप्रवाशांनी उठवले. या गोष्टीचा इतका राग आला की, त्या व्यक्तीने थेट स्वतःवरच ब्लेडने वार केले. या प्रकारामुळे डब्यात एकच खळबळ उडाली आणि प्रवासी प्रचंड घाबरले.
नेमकं काय घडलं ?
https://www.prahaar.in/2026/11/24/madrasas-are-hubs-for-grooming-terrorists-minister-nitesh-rane-launches-a-scathing-attack/
नालासोपाऱ्याहून दादरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात एक प्रवासी गाढ झोपला होता. डब्यात गर्दी वाढत असल्याने आणि प्रवाशांना बसायला जागा हवी असल्याने इतर प्रवाशांनी त्याला आवाज देऊन जागे करण्याचा प्रयत्न केला.
केसांत लपवलेले ब्लेड काढले आणि…
#Watch | A man created panic in a Nalasopara-Dadar local train after passengers tried to wake him up while he was sleeping in the handicapped compartment.
The man allegedly started shouting, took out a blade hidden in his hair and began attacking himself, causing injuries that left him bleeding.
The incident terrified passengers and created chaos in the compartment.#MumbaiLocal #Nalasopara #Dadar #MumbaiNews #WesternRailway #ViralVideo #FreePressJournal #FPJ #FPJNews
— Free Press Journal (@fpjindia) November 24, 2026
झोपेतून उठवल्यामुळे संबंधित व्यक्तीचा संताप अनावर झाला. त्याने डब्यात मोठमोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. प्रवासी काही समजून घेण्याच्या आतच या व्यक्तीने आपल्या केसांमध्ये लपवून ठेवलेले धारदार ब्लेड बाहेर काढले आणि स्वतःच्याच अंगावर वार करून घेतले. स्वतःवर केलेल्या वारांमुळे हा प्रवासी गंभीर जखमी झाला आणि त्याच्या अंगातून रक्त वाहू लागले. हातात धारदार ब्लेड आणि अंगावर रक्त पाहून डब्यातील इतर प्रवासी अक्षरशः हादरून गेले. चालत्या ट्रेनमध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली आणि डब्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, लोकल प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.