Home मनोरंजन OTT Releases This Week : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका ! ‘दृश्यम 3’ सह 7 चित्रपट-सिरीज होणार रिलीज

OTT Releases This Week : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका ! ‘दृश्यम 3’ सह 7 चित्रपट-सिरीज होणार रिलीज

0
OTT Releases This Week : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा धमाका ! ‘दृश्यम 3’ सह 7 चित्रपट-सिरीज होणार रिलीज

नोव्हेंबर २०२६ चा शेवटचा आठवडा मनोरंजनप्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या आठवड्यात ओटीटीवर अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. अजय देवगणचा ‘दृश्यम : द कन्क्लूजन’, भक्तिप्रधान ‘हनुमान अंश’ यांसारख्या चित्रपटांसह थ्रिलर, रोमँटिक आणि सायन्स फिक्शन अशा वेगवेगळ्या जॉनरमधील कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, सोनी लिव्ह आणि जिओ हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि सीरिज रिलीज होणार आहेत? जाणून घेऊया संपूर्ण यादी.

हनुमान अंश (Hanuman Ansh)

भक्तिप्रधान कथा पाहण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘हनुमान अंश’ हा चित्रपट खास ठरणार आहे. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. लक्ष्मण दास शर्मा यांच्या सुरुवातीच्या आयुष्यावर आणि त्यांच्या आध्यात्मिक परिवर्तनावर ही कथा आधारित आहे. पुढे हेच लक्ष्मण दास शर्मा नीम करौली बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ पासून सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.

दृश्यम : द कन्क्लूजन (Drishyam: The Conclusion)

अजय देवगणच्या चाहत्यांसाठी या आठवड्यात मोठी पर्वणी असणार आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा तिसरा आणि अंतिम भाग असलेला ‘दृश्यम : द कन्क्लूजन’ ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बू, रजत कपूर, श्रिया सरन आणि इशिता दत्ता यांच्यासह जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट २७ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

ढाई चाल (Dhai Chaal)

कॉलेजमधील राजकारण, मैत्री आणि सत्तासंघर्ष यांवर आधारित ‘ढाई चाल’ ही स्टुडंट पॉलिटिकल ड्रामा सीरिज आहे. मयूर भारद्वाज या विद्यार्थ्याच्या आयुष्याभोवती या सीरिजची कथा फिरते. कॉलेजच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. मित्रांसोबत मिळून तो कॉलेजमधील गटबाजी, बदलती नाती आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या संघर्षाचा सामना करतो. या प्रवासात त्याला आपला पूर्वीचा मार्गदर्शक राघवेंद्र शर्मा यालाही आव्हान द्यावे लागते. ही सीरिज २७ नोव्हेंबरपासून जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/miley-cyrus-maxx-morando-share-wedding-photos/

ब्लेड रनर 2099 (Blade Runner 2099)

सायन्स फिक्शन आणि थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘ब्लेड रनर 2099’ ही सीरिज आकर्षण ठरणार आहे. कोरा नावाच्या एका फरार तरुणीची ही कथा आहे. आपल्या भूतकाळापासून दूर जाण्यासाठी ती ‘ब्लेड रनर’ अशी नवी ओळख स्वीकारते. यानंतर तिची ओल्वेनसोबत भेट होते आणि दोघी एकत्र काम करू लागतात. या सीरिजमध्ये हंटर शेफर आणि मिशेल योह महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज २५ नोव्हेंबरपासून प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

द हंचबॅक : सोल ऑफ पॅरिस (The Hunchback: Soul of Paris)

१८३० च्या पॅरिसच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट एका वेगळ्याच रहस्यमय कथानकाची ओळख करून देणार आहे. क्वासिमोडो नावाचा दगड कोरणारा कारागीर या कथेचा केंद्रबिंदू आहे. शहरात कॉलराची जीवघेणी महामारी पसरल्यानंतर वैद्यकीय प्रयोगांसाठी त्याला लक्ष्य केले जाते. अशा परिस्थितीत आपली प्रेयसी अॅग्नेसला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करतो. मात्र, या प्रवासात त्याच्यासमोर अनेक संकटे उभी राहतात. हा चित्रपट २७ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

नोटबुक 90s – कादल फ्लॅशबॅक (Notebook 90s – Kadhal Flashback)

रोमँटिक कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘नोटबुक 90s – कादल फ्लॅशबॅक’ ही तमिळ सीरिज पाहता येणार आहे. गौतम आणि गायत्री या दोन पात्रांची ही प्रेमकथा आहे. शाळेतील एका खोडकर प्रसंगातून त्यांच्या नात्याची सुरुवात होते आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर पहिल्या प्रेमात होते. ही सीरिज २३ नोव्हेंबरपासून सोनी लिव्हवर स्ट्रीम होणार आहे.

स्वीटपी (Sweetpea)

डार्क कॉमेडी आणि थ्रिलरचा मिलाफ असलेली ‘स्वीटपी’ ही सीरिजही या आठवड्यात रिलीज होणार आहे. रियानॉन लुईस या तरुणीची ही कथा आहे. आयुष्यभर लोकांकडून होणारा अपमान आणि त्रास सहन केल्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल घडतात. वडिलांच्या मृत्यूनंतर आणि शाळेच्या दिवसांत तिला त्रास देणाऱ्या एका व्यक्तीच्या पुन्हा आयुष्यात येण्यामुळे तिच्या संयमाचा बांध फुटतो. यानंतर तिच्यामध्ये हत्येबद्दल एक विचित्र आकर्षण निर्माण होते. एला पर्नेल मुख्य भूमिकेत असलेली ही सीरिज २६ नोव्हेंबरपासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here