Home ब्रेकिंग न्यूज Sharad Pawar : रोहित पवारांच्या नागपूर मोर्चापासून दूर राहण्याचे शरद पवार गटाचे पदाधिकाऱ्यांना आदेश?

Sharad Pawar : रोहित पवारांच्या नागपूर मोर्चापासून दूर राहण्याचे शरद पवार गटाचे पदाधिकाऱ्यांना आदेश?

0
Sharad Pawar : रोहित पवारांच्या नागपूर मोर्चापासून दूर राहण्याचे शरद पवार गटाचे पदाधिकाऱ्यांना आदेश?
Sharad Pawar And Rohit Pawar

मुंबई : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी नागपूरमध्ये ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ आयोजित केला असताना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना या आंदोलनापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना वरिष्ठ नेत्यांनी मोर्चात सहभागी न होण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे रोहित पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेतृत्व यांच्यातील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/23/anger-at-giving-land-to-daughter-80-year-old-father-burnt-to-death-by-his-son-in-madhya-pradesh/

अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरून रोहित पवार गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकारवर सातत्याने आरोप करत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी त्यांनी विविध माध्यमांतून आवाज उठवला असून, आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. शेगाव ते बुटीबोरीमार्गे नागपूर विधानभवनावर हा मोर्चा नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांच्या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होऊ नयेत, यासाठी शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात रविवारी नागपूरमध्ये विदर्भातील ग्रामीण आणि शहरी जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांना केवळ प्रदेश कार्यालयाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले. रोहित पवार यांच्या कोणत्याही आंदोलनात किंवा उपक्रमात सहभागी होऊ नये, असेही निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात आणि राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पक्ष सत्तेत सहभागी झाल्यास आपण त्यात जाणार नसल्याची भूमिका रोहित पवार यांनी यापूर्वी मांडली होती. पक्षाने सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यास पर्यायी मार्ग निवडण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील मोर्चापासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दूर राहण्याच्या सूचना दिल्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here