PUC Validity Check: जर तुम्ही कार किंवा बाईक चालवत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनच्या एका क्लीकवर तुमच्या गाडीची पीयूसी प्रमाणपत्राची वैधता तपासू शकता. मुदत संपल्यानंतर वाहन चालवणे महागात पडू शकते.
जर तुमच्याकडे कार किंवा बाईक असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. गाडी चालवताना केवळ ड्रायव्हिंग लायसन्स आणि विमा असणे एवढेच गरजेचे नाही. तर तुमच्याकडे वैध पीयूसी (PUC) प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे. पीयूसी, म्हणजेच ‘प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र’, हे दाखवते की तुमच्या वाहनाचे उत्सर्जन स्थापित नियमांच्या मर्यादेत आहे की नाही.
आपल्यापैकी अनेक लोक पीयूसी (PUC) मिळाल्यानंतर त्याची मुदत तपासण्यास विसरतात. त्यामुळे जर प्रमाणपत्राची वैधता संपली असेल आणि तुम्ही रस्त्यावर तुमचे वाहन चालवले, तर तुम्हाला दंड होऊ शकतो. मात्र आता तुमच्या पीयूसीची वैधता सुरु आहे की संपले ही माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून घरबसल्या तुमच्या पीयूसीची (PUC) मुदतची तारीख तपासू शकता.
https://www.prahaar.in/2026/11/23/gold-prices-fall-yet-china-buys-in-record-amounts-what-exactly-is-the-strategy/
फोनवरून पीयूसी वैधता कशी तपासावी
यासाठी तुम्हाला परिवहन वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे, तुम्ही काही सोप्या पायऱ्यांचे अनुसरण करून तुमच्या वाहनाची संपूर्ण नोंद पाहू शकता.सगळ्यात आधी मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये परिवहनची अधिकृत पीयूसी वेबसाइट उघडा. त्यानंतर तुम्हाला पीयूसी प्रमाणपत्राशी संबंधित एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक म्हणजेच नंबर प्लेट नंबर टाका. यानंतर वाहनाच्या चेसिस नंबरमधील शेवटचे 5 अक्षरं टाका. आता स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करा. ही सर्व माहिती भरूनझाल्यानंतर पीयूसी तपशील (PUC Details) या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या वाहनाच्या पीयूसी प्रमाणपत्राबद्दलची माहिती स्क्रीनवर दिसेल आणि येथे तुम्ही त्याची वैधता आणि समाप्तीची तारीख तपासू शकता. तसेच पीयूसीची वैधता तपासा .
पीयूसी प्रमाणपत्राची वैधता प्रत्येक वाहनासाठी सारखी नसते. ती वाहनाच्या उत्सर्जन मानकांवर आणि त्याच्या वयावर अवलंबून असते. त्यामुळे, आपल्या प्रमाणपत्रावरील अंतिम मुदत तपासणे महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. जर तुमचे पीयूसी (PUC) प्रमाणपत्र संपणार असेल, तर वेळेवर नवीन प्रमाणपत्र काढून घ्या. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास वाचेल आणि अनावश्यक दंडाचा धोकाही टळेल. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पीयूसी प्रमाणपत्राची मुदत तपासण्यासाठी कोणत्याही अनोळखी वेबसाइटचा वापर करू नका. तुमच्या वाहनाचा तपशील नेहमी सरकारी परिवहन पोर्टलवरच तपासा.