Home क्रीडा WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या

WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या

0
WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या
WTC Points Table: वेलिंग्टन कसोटी ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचा अंतिम फेरीचा मार्ग खडतर, कसं काय ते जाणून घ्या (Photo: BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने भारताचं मोठं नुकसान झालं आहे. या निकालामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठण्याच्या स्वप्नांना काही अंशी सुरूंग लागला आहे. खरं भारताने न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना सहज जिंकला असता अशी स्थिती होती. मात्र तसं काही झालं नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी चिवट फलंदाजी केली आणि भारताचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. सामना ड्रॉ झाल्याने त्याचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर झाला आहे. खरं तर गुणतालिकेतील क्रमवारीवर काही फरक पडला नाही. मात्र विजयी टक्केवारीत घसरण झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत असा पडला फरक

न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने गुणातिलेकतील क्रमवारीत फार काही बदल झालेला नाही. भारतीय संघ चौथ्या स्थानावर कायम आहे. पण विजयी टक्केवारी 51.52 वरून 50 टक्के झाली आहे. भारताने 12 कसोटी सामन्यात पाच विजय, चार पराभव आणि तीन अनिर्णित सामन्यांसह संघ चौथ्या स्थानावर आहे. भारताकडे 72 गुण आहेत.तर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 66.67 टक्के इतकी आहे. सात कसोटी सामन्यांत चार विजय, एक पराभव आणि दोन अनिर्णित सामन्यांसह 56 गुण मिळवून हा संघ आता तिसऱ्या स्थानावर आहे.दक्षिण अफ्रिकेचा संघ 75 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलियाचा संघ 69.23 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न आता खूपच किचकट झालं आहे.

https://www.prahaar.in/2026/11/23/ind-vs-nz-match-ends-in-a-draw-team-india-lets-a-winning-position-slip-away/

भारताचं गणित असं झालं किचकट

भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या चक्रात सहा कसोटी सामने शिल्लक आहेत. यात न्यूझीलंडविरुद्ध एक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहे. आता भारताला सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. भारत न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका भारतात खेळली जाणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या कामगिरीवरही भारताचं अंतिम फेरीचं गणित अवलंबून असणार आहे. न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. दक्षिण आफ्रिका मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर फेब्रुवारी 2027 मध्ये श्रीलंकेचा दौरा करेल.त्यामुळे हे देश कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे. पण भारताने यापुढे एकही सामना गमावला तर अंतिम फेरीत खेळण्याचं स्वप्न भंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here