मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालकीचे बोरीवलीतील हरिलाल भगवती मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता बांधून तयार झाले असून हे रुग्णालय खासगी संस्थेच्या माध्यमातून चालवण्यासाठी दिले जाणार आहे. तब्बल 490 खाटांपैंकी सुमारे 250 खाटा या महापालिकेच्या दरात उपचार करण्यासाठी राखीव असतील. विशेष म्हणजे यासाठीचे जे निकष पूर्ण करेल त्या संस्थेची निवड मार्चपर्यंत अपेक्षित असून त्यानंतर पुढील तीन महिन्यांचा मोबीलायझेशन टाईम असल्याने जूननंतरच याठिकाणी खऱ्या अर्थाने रुग्णांना सेवा मिळणार आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात जन्मलेल्या बाळांसाठी 50 एनआयसीयू खाटा तसेच जळालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 20 खाटांची एक स्वतंत्र कक्षाची सुविधा असणार आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने तसेच त्यांचे मानधन अधिक देणे शक्य नसल्याने भगवती रुग्णालय हे बांधून तयार आहे, पण गोरगरीब जनतेला याठिकाणी उपचार देता येत नाही.त्यामुळे खासगी सहभाग तत्वावर अर्थात पीपीपी धोरणांतर्गत पूर्वीच्या धोरणातील त्रुटी सुधारुन नवीन धोरणानुसार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या दरात रुग्णांना उपचार करण्यासाठी एकूण 490 च्या तुलनेत सुमारे 250 खाटा राखीव ठेवणे तसेच येथील यंत्रसामृगी आणि मनुष्यबळ यासाठी दीडशे ते पावणे दोनशे रुपये खर्च करणे, शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोगय योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार देण्याच्या अटींवर निविदा मागवण्यात आली आहे. त्यातमध्ये जो पात्र ठरेल त्या संस्थेची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सध्या यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु असल्याची माहिती भाजपच्या आमदार मनिषा चौधरी आणि सभागृहनेते गणेश खणकर यांनी या रुग्णालयात अयोजित जाहीर पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, योगिता पाटील, नगरसेवक जितेंद्र पटेल तसेच उपनगरीय रुग्णालयांचे संचालक चंदकांत पवार आदी उपस्थित होते.(BMC)
https://www.prahaar.in/2026/11/22/gold-and-silver-prices-have-plummeted-a-massive-drop-from-record-highs/
हे रुग्णालय पीपीपी तत्वावर दिल्यामुळे महापालिकेचे जे वर्षांला दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च होतात ते वाचले जातील,उलट वर्षाला 6 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त होतील. या बदल्यात नियुक्त संस्थेमार्फत 50 टक्के खाटा ज्या राखीव मिळतील तिथे सरकारी योजनांसाठी तसे महापालिका रुग्णांसाठी उपचार मिळेल. सर्वसामान्य ओपीडीत 10 रुपयांच्या केसपेपरमध्ये महापालिकेच्या रुग्णालयात जसे उपचार मिळतात, तसेच उपचार याठिकाणी मिळतील. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार देण्यात येणार असून जे रुग्ण या नियमांमध्ये बसत नसतील त्यांच्यावर महापालिकेच्या दरात उपचार होती आणि त्यांच्यावरील वैद्यकीय उपचाराची रक्कम महापालिकेच्यावतीने व्यवस्थापनाला दिले जाईल.त्यामुळे या रुग्णालयात एकही गरीब रुग्ण वैद्यकीय उपचारापासून वंचित राहणार नाही.
तळ अधिक आठ मजल्याच्या या रुग्णालयांमध्ये कॅथ लॅब, एमआरआय, सीटी स्कॅन आणि 9 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स महापालिकेच्या खर्चाशिवाय उपलब्ध होणार आहे. शिवाय 90 खाटांचे आयसीयू असतील त्यातील 45 खाटा या महापालिकेच्या रुग्णांसाठी राखीव असतील. विशेष म्हणजे याठिकाणी महापालिकेचे कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचारी यांनाही महापालिकेच्या दरातच उपचार दिले जाणार आहेत.(Borivali)
https://www.prahaar.in/2026/11/22/anirudh-ravichander-kavya-maran-reception-inside-photos-vvip-guests-rajinikanth-cm-vijay-spotted/
या रुग्णालयात जमीन व इमारत कायमच महापालिकेची राहणार आहे. याठिकाणी प्रसुतीगृहाची स्वतंत्र मजला असून यामध्ये 50 खाटा जन्मलेल्या बाळांवर उपचार करण्यासाठी एनआयसीयू करता राखीव आहेत. यापूर्वी या रुग्णालयात केवळ यासाठीच्या 20 खाटा होत्या. यापूर्वी रुग्णालयात जळालेल्या रुग्णांवर उपचार कक्ष नव्हता, पण आता 20 खाटांचा एक विभाग वातानुकुलित आहे. याशिवाय अत्याधुनिक शवागार बनवलेले असून यामध्ये 55 शव ठेवण्याची व्यवस्था आहे. तसेच 14 ऑपरेशन थिएटर आहेत.(Public Health)
प्रत्येक दरांवर कडक नियंत्रण, कसे असणार हॉस्पिटल सर्विस रेट
- सर्वसामान्य ओपीडी तपासणी : फक्त दहा रुपये
- स्पेशल ओपीडी : 293 रुपये
- मोठ्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर शुल्क : जास्तीत जास्त 1200 रुपये