नाशिक : नाशिक शहरातील काही भागांतील वीजपुरवठा रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सहा तास बंद राहणार आहे. महावितरणकडून पंचक, मुक्तिधाम आणि देवळाली कॅम्प उच्चदाब वाहिन्यांसह ३३ केव्ही सिक्युरिटी प्रेस विद्युत वाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत संबंधित विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरातील वीजपुरवठा खंडित राहणार आहे.
कोणत्या भागात वीजपुरवठा राहणार बंद ?
महावितरणच्या या कामामुळे जेल रोड, कैलासजी सोसायटी, भीमनगर, ब्रह्मगिरी सोसायटी, साने गुरुजीनगर, कलानगर, आशानगर, गंधर्व नगरी, लोकमान्यनगर आणि मोटवानी रोड परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय पंचक, मुक्तिधाम आणि देवळाली कॅम्प विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या इतर भागांनाही या वीजखंडित कालावधीचा फटका बसणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/21/turmoil-in-nida-khans-married-life-following-the-tcs-case-nida-strives-to-save-her-marriage-second-counseling-session-held-via-video-conferencing/
महावितरणचे ग्राहकांना आवाहन
विद्युत वाहिन्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी हा नियोजित वीजखंडित कालावधी ठेवण्यात आला आहे. काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण झाल्यास वीजपुरवठा लवकर सुरू केला जाऊ शकतो. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे कामास विलंब झाल्यास वीजपुरवठा पूर्ववत होण्यास अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे संबंधित भागातील नागरिकांनी आणि वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग क्रमांक २ कडून करण्यात आले आहे.