पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. फेब्रुवारी- मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या अर्थशास्त्र विषयाच्या परिक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती शिक्षण मंडळाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून दिली आहे. बदलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच आपल्या परिक्षेचा अभ्यास करावा अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. इयत्ता दहावीच्या परिक्षेच्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर, बारावीच्या इतरत्र कोणत्याही विषयाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला नाही.
https://www.prahaar.in/2026/11/20/first-bullet-train-india-mumbai-ahmedabad-track-big-day-surat-to-bilimora-power-supply-start-today/
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामध्ये, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे नवीन सुधारित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी- मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणार्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षांची दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर 6 नोव्हेंबर 2026 रोजी, उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेतील अर्थशास्त्र या विषयाच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात येत आहे. त्याचा तपशील विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळेल.
https://www.prahaar.in/2026/11/20/soldier-jayesh-mali-from-dhule-martyred-in-an-accident-in-manipur-maharashtra-cm-devendra-fadnavis-pays-tribute/
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये घेण्यात येणार होता. परंतु आता वेळापत्रकामध्ये करण्यात आलेल्या अंशतः बदलाप्रमाणे, अर्थशास्त्राचा पेपर 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या सुधारित तपशीलाची नोंद विद्यार्थ्यांनी व्यवस्थित करून घ्यावी. दिलेल्या बदलाव्यतिरिक्त उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षांच्या उर्वरित वेळापत्रकामध्ये कोणताही बदल नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.
https://www.prahaar.in/2026/11/20/retired-rto-official-dies-by-suicide-in-nashik-shoots-himself-at-his-residence/
दरम्यान, “परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक ते अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.”, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.