Home ब्रेकिंग न्यूज Public Private Partnership: महापालिकेच्या नवीन रुग्णालयांमध्ये पीपीपी अंतर्गत् चांगल्याप्रकारे मिळणार सुविधा

Public Private Partnership: महापालिकेच्या नवीन रुग्णालयांमध्ये पीपीपी अंतर्गत् चांगल्याप्रकारे मिळणार सुविधा

0
Public Private Partnership: महापालिकेच्या नवीन रुग्णालयांमध्ये पीपीपी अंतर्गत् चांगल्याप्रकारे मिळणार सुविधा
(Photo: Social Media)

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असून यासाठी पूर्वीच्या सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर अर्थात पीपीपी धोरणात बदल करून सुधारीत धोरणानुसार रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिले जात आहे. पीपीपी विरोध आहेतच , पण त्यात सुधारणा करून ही वैद्यकीय आरोग्य सेवा दिली जाणार असून बोरीवलीतील भगवती रुग्णालय हे खासगी संस्थेला दिले जाणार आहे. ते मुंबईतील पहिले पीपीपी अंतर्गत एम्सच्या नियमावलीनुसार चालवले जाणार आहे, त्यामध्ये 50 टक्के खाटा या गोरगरीब जनतेसाठी असतील आणि महापालिकेसाठी राखीव असलेल्या जागांवर उपचार दिला जातो त्यांची माहिती बाहेर स्क्रिनवर बेड क्रमांकासह रुग्णाच्या नावासह दर्शवली जाणार आहे.(Healthcare For All)

https://www.prahaar.in/2026/11/20/ban-on-rockets-and-aerial-fireworks-in-mumbai-municipal-corporation-administration-issues-orders/

महापालिका सभागृहात काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी मध्यवर्ती प्राधिकरण खात्यांच्यावतीने रुग्णालयांसाठी अनुसुचीवरील औषधांची खरेदी केली जात नाही. त्यामुळे रुग्णालयांमध्ये स्थानिक पातळीवर औषधे खेरदी केली जात आहे. तसेच ज्या कंपन्यांची औषधांच्या खरेदीसाठी कंपन्यांची निवड केली,त्यातील अनेक अनेक कंपन्यांनी प्रत्यक्षात औषधांचे वितरणही केले नाही . त्यामुळे बाहेरुन औषधे खरेदी करावी लागत आहे

तसेच महापालिकेची रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास दिली जात आहे असे सांगत याबाबत आपला हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्याची मागणी केली.

यावर भाजपचे हरिष छेडा यांनी मध्यवर्ती खरेदी विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत या विभागाचे उपायुक्तच बदलले जात असल्याने या विभागाचा कारभार योग्यप्रकारे चालत नाही. यावेळी त्यांनी भाभा रुग्णालयात जिथे पॅरोसिटॉमॉल हे औषध 16.50 रुपयांमध्ये दिले आणि तेच औषध आणि तिच कंपनी व्ही. एन.देसाई रुग्णालयात 25.80 रुपयांमध्ये दिले जाते. त्यामुळे श्री एंटरप्रायझेस या कंपनीने तर 350 पटीने औषधे खरेदी केली असाही आरोप केला. त्यामुळे सुमारे 95 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचेही आरोप केला.(Better Healthcare)

https://www.prahaar.in/2026/11/20/soldier-jayesh-mali-from-dhule-martyred-in-an-accident-in-manipur-maharashtra-cm-devendra-fadnavis-pays-tribute/

यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी महापालिकेच्या रुग्णालयातील कायम कर्मचारी असलेल्या परिचारिकांनी मला 25 मिनिटे रांगेत उभे ठेवले आणि त्यानंतर कंत्राटी नर्स आल्यानंतर माझे रक्त घेतले. त्यामुळे कायम कर्मचारी योग्यप्रकारे काम करत नसल्याचे उदाहरण दिले. त्यामुळे यापूर्वीच्या पीपीपी धोरणांतर्गत सुधारणा करून मुंबईकरांना चांगल्याप्रकारची आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. असे बोरीवलीतील भगवती रुग्णालय पीपीपी धोरणांतर्गत दिले जात असून यामध्ये 50 टक्के खाटा गोरगरीब जनतेसाठी राखीव ठेवले जाईल आणि एम्सच्या नियमांनुसार हे रुग्णालय चालवले जाईल. तसेच रुग्णालयातील ओषधांच्या खरेदीचा मुद्दा गंभीर आहे. यावेळी झालेल्या चर्चत प्रकाश दरेकर, श्रध्दा जाधव, यामिनी जाधव, राखी जाधव, डॉ सईदा खान, कॅरन डिमेलो, जमीर काझी, सिध्दार्थ शर्मा आदींनी चर्चेत भाग घेतला होता. यावेळी महापौरांनी हा याबाबतचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.(Quality Healthcare)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here