भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने सरशी घेतली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने कमबॅक केलं आणि टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललं. हेनरी निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर होतं. ही जोडी फोडण्याची संधी पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आली होती. मात्र एका चुकीच्या कॉलमुळे हातातली सोपी विकेट गेली. भारताकडून 74वं षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा आला होत्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू खेळताना निकोल्स चुकला आणि चेंडू वर चढला. त्यामुळे हा सोप झेल सहज पकडला जाईल असंच सर्वांना वाटलं. पण तसं झालं नाही. एक चुकीचा कॉल आणि हातातला झेल सुटला. त्यामुळे कर्णधार शुभमन गिलच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसला.
झेल पकडताना काय झालं?
प्रसिद्ध कृष्णाने निकोल्सला आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. यावर पुल शॉट मारताना निकोल्स चुकला आणि चेंडू बॅटच्या कडेला लागून बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या देवदत्त पडिक्कलच्या हाती सोपा झेल होता. पण विकेटकीपर ऋषभ पंत त्या झेलसाठी धावत गेला आणि देवदत्त पडिक्कल कन्फ्यूज झाला. त्यात त्याने झेल पकडण्याचा कॉल दिल्याने पडिक्कल निश्चिंत राहिला. पण त्याला शेवटच्या क्षणी कळलं की हा झेल त्याचा आहे आणि त्याने हात टाकला. पण तिथपर्यंत उशीर झाला आणि सोपा झेल सुटला. सोपा झेल सुटल्याने प्रसिद्ध कृष्णाने आश्चर्य व्यक्त करत हाताने तोंड झाकले. तर देवदत्त पडिक्कल पंतकडे पाहत राहिला. झेल सुटल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
🔴DEVDUTT PADIKKAL DROPS AN EASY CATCH, GILL ANGRY WITH HIM 🤦
– Prasidh Krishna bowled a bouncer to Henry Nicholls, which resulted in a catching opportunity for India.
– Padikkal & Pant both ran towards the ball. Padikkal called for the catch, saying it was his, but ended up dropping it.
– Gill was furious and shouted at him, while Pant also had something to say. 😒
— Sam (@cricsam02) November 19, 2026
https://www.prahaar.in/2026/11/19/ind-vs-nz-1st-test-new-zealand-scored-243-runs-for-the-loss-of-5-wickets-on-the-first-day-bumrah-took-three-wickets/
कर्णधार शुभमन गिलचा संताप
खरं तर देवदत्त पडिक्कल या झेलखाली सहज आला होता. त्याला फार काही धावावं लागलं नव्हतं. पण पंत धावत तिथे पोहोचला होता. देवदत्त पडिक्कलला पुढे येताना पाहून क्षणभर थांबला आणि म्हणाला, “तुझा झेल”, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सोपा झेल सुटल्याने कर्णधार शुभमन गिल आतून संतापलेला होता पण एक शब्दही बोलला नाही. दोघांच्या चुकीमुळे टीम इंडियाला फटका बसला आहे. कारण निकोल्स हा 102 धावांवर होता आणि त्याने दिवसअखेर नाबाद 113 धावांची खेळी केली. तसेच ग्लेन फिलिप्ससोबत नाबाद 173 धावांची भागीदारी कायम राहिली. त्यामुळे पहिल्या दिवशी टिम इंडिया बॅकफूटवर गेली.