मुंबई: अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमच्या घरावर मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालवला आहे. दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया इस्टेट जवळील हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना इमारतीवर आज हातोडा चालवला आहे. महानगर पालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये अंडरवर्ल्डच्या घरावर हातोडा चालवला आहे. बीएमसीने केलेल्या ह्या कारवाईवर संपूर्ण मुंबईचे लक्ष लागून राहिले होते. दाऊदचं हे वडिलोत्पार्जित घर आहे. संपूर्ण इमारत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे आणि छत केव्हाही कोसळण्याच्या भीतीमुळे बीएमसीने आज तोडक कारवाई करत इमारतीच्या पाडकामाला सुरूवात झाली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/several-artists-including-ayushmann-khurrana-who-have-either-received-threats-or-been-subjected-to-attacks-are-likely-to-be-provided-with-x-category-security/
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या धोकादायक इमारतीवर पाडकामाची कारवाई सुरू केली आहे. या इमारतीला C-1 श्रेणीतील अत्यंत धोकादायक इमारत घोषित करण्यात आले होते. कालच महापालिकेकडून या कारवाईची सर्व तयारी पूर्ण केली होती आणि आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह पाडकामाला सुरुवात केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडील इब्राहिम कासकर यांचे हे घर असल्याचे सांगितले जात आहे. ज्या परिसरामध्ये दाऊद लहानाचा मोठा झाला आणि जिथे त्याचे घर आणि कार्यालय होते. या पाडकामादरम्यान मुसाफिरखाना येथील मशिदीच्या तोडक कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत असल्याचे पाहायला मिळाले. या घराच्या खाली मशिद असून, कारवाईत मशिदीला कोणताही धक्का लागू नये, अशी आग्रही भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/19/pedestrians-first-650-metre-long-footpath-on-mahatma-gandhi-road-in-vile-parle-becomes-obstruction-free/
“दाऊदचे घर पाडा, पण मशिदीला धक्का लागू देऊ नका,” अशी मागणी करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा तणाव वाढू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. प्रत्यक्ष पाडकाम सुरू असताना पोलिसांचे परिसरातील प्रत्येक बारीक हालचालीवर करडी नजर आहे. ही कारवाई केवळ एका घरापुरती मर्यादित नसून हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना या जीर्ण व धोकादायक इमारतीवर करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही इमारत जमीनदोस्त करणे गरजेचे ठरले असून, महापालिकेकडून यापूर्वीच संबंधित नोटीस बजावण्यात आली होती.
https://www.prahaar.in/2026/11/19/road-cleared-in-the-patilwadi-area-of-dahisar-19-structures-removed-for-road-widening/
एकूणच, C-1 श्रेणीतील धोकादायक इमारतीवरील कारवाई, दाऊदच्या वडिलोपार्जित घराशी जोडला गेलेला संदर्भ आणि स्थानिकांचा विरोध या सर्व बाबींमुळे भेंडी बाजार व मुसाफिरखाना परिसरात सध्या संवेदनशील वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.