Home क्राईम Jalgaon Crime : जळगावात लग्नमंडपात रक्ताचा थरार ! 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Jalgaon Crime : जळगावात लग्नमंडपात रक्ताचा थरार ! 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

0
Jalgaon Crime : जळगावात लग्नमंडपात रक्ताचा थरार ! 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Jalgaon Crime : लग्नसोहळ्यातील आनंदाचे वातावरण क्षणात शोककळेत बदलले. जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसमारंभात झालेल्या वादातून २३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. प्रेम गोपाल धनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि. १९) सायंकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लग्नमंडपातील वादाचे रूपांतर हाणामारीत

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा बोरनार येथील रहिवासी असून, काही महिन्यांपासून कामानिमित्त अमळनेर येथे वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी परतला होता. बुधवारी गावात लग्नसमारंभ असल्याने प्रेम सायंकाळी लग्नमंडपात गेला होता. यावेळी काही जणांसोबत त्याचा वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

याचदरम्यान टोळक्यातील एका तरुणाने प्रेमवर धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात प्रेम गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. अवघ्या २३ वर्षांच्या प्रेमचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/19/audio-clip-adds-a-twist-to-the-nashik-tcs-case-imtiaz-jaleel-to-appear-in-court-today/

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, या प्रकरणात पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. हत्येमागील नेमके कारण काय होते, वाद कशामुळे सुरू झाला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. लग्नसमारंभासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे बोरनार गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणाच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here