Home ताज्या घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या सूचना अन् महापालिका सभागृह भरले घड्याळाच्या काट्यावर; काल नेमकं BMC च्या सभागृहात काय घडलं

मुख्यमंत्र्यांच्या सूचना अन् महापालिका सभागृह भरले घड्याळाच्या काट्यावर; काल नेमकं BMC च्या सभागृहात काय घडलं

0
मुख्यमंत्र्यांच्या सूचना अन् महापालिका सभागृह भरले घड्याळाच्या काट्यावर; काल नेमकं BMC च्या सभागृहात काय घडलं
मुख्यमंत्र्यांच्या सूचना अन् महापालिका सभागृह भरले घड्याळाच्या काट्यावर; काल नेमकं BMC च्या सभागृहात काय घडलं फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेचे सभागृह हे मागील काही महिन्यांपासून नियोजित वेळेत सुरु न करता एक ते दीड तास उशिराने सुरु केले जात होते. याची दखल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. आणि त्यांनी महापौरांसह सभागृहनेत्यांना निर्देश दिल्यानंतर बुधवारी झालेल्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सभेचे कामकाज अगदी दुपारी 2 वाजता घड्याळाच्या काट्यावर सुरु झाले. महापौर चक्क दोन वाजताच सभागृहात दाखल झाल्या आणि त्यांनी कामकाजाला सुरुवात केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा डोस महापालिकेत लागू झाल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेत फेब्रुवारी महिन्यात नवीन महापालिका अस्तित्वात आल्यानंतर सुरुवातीला वेळेत सुरु होणारे सभागृहाचे कामकाज पुढे एक ते दीड तास किंवा त्याहून अधिक उशिराने सुरु केले जात होते. तसेच उशिराने कामकाज सुरु करतानाच रात्री उशिरापर्यंत ते चालवले जात होते. त्यामुळे यापूर्वीच पक्षाकडे नाराजी पोहोचली होती. त्यातच मागील वेळेस पार्टीसिपेट मुंबईच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापालिका मुख्यालयात आले असता महापौर आणि सभागृहनेत्यांनी त्यांना दालनात येण्याची विनंती केली. परंतु मला वेळेतच कॅबिनेट सुरु करायची असते, तुमच्यासारखे उशिराने नाही असा मिश्किल टोला मारला होता.

https://www.prahaar.in/2026/11/19/opposition-to-the-privatization-of-a-dialysis-center-under-the-brihanmumbai-municipal-corporation-bmc-in-dharavi-the-improvements-committee-rejects-the-proposal/

त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी महापौर आणि सभागृहनेत्यांना वेळेतच सभागृह सुरु करा अशी सूचना केली होती. त्यानुसार बुधवारी 18 नोव्हेेंबर रोजी झालेल्या महापालिकेचे सभागृहातील कामकाजाला 2 वाजता सुरु होईल असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार महापौर रितू तावडे यांनी चक्क 2 वाजताच सभागृहात प्रवेश केला आणि कामकाजाला सुरुवात केली. तसेच भाजप नगरसेवकांना यापूर्वीच सभागृहात जावून बसण्याच्याही सूचना केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथम वेळेत घड्याळाच्या काट्यावरच सभागृह सुरु झाल्याचे दिसून येत आले आहे.

विरोधकांचा गोंधळाने सुरुवात

महापालिका सभागृह वेळेत सुरु झाल्याने शिवसेनेने मात्र शायना एन.सी यांच्या विरोधात घोषणा देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी यावर निवेदन करण्याचा प्रयत्न केला. परंतु महापौरांनी सभागृहाच्यावतीने बाळासाहेबांचा अवमान कुणीही सहन करणार नाही असे सांगत विरोधकांना शांत करण्याचे काम केले. परंतु त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरु असल्याने महापौरांनी नियमित कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे याचा निषेध व्यक्त करत उबाठासह काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी सभात्याग करत सभागृहाबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

https://www.prahaar.in/2026/11/19/proposal-to-take-over-aarey-hospital-aimed-at-providing-healthcare-facilities-near-their-homes-for-the-tribal-population-in-aarey-colony-approved-by-the-improvements-committee/

तब्बल 100 प्रस्तावांना दिली मंजुरी

विरोधी पक्षाने सभात्याग केल्यानंतर महापौरांनी नियमित कामकाजाला सुरुवात करत सप्टेंबर महिन्याचे 17 प्रस्ताव, ऑक्टोबर महिन्याचे सुमारे 80 प्रस्ताव आणि नोव्हेंबर महिन्याचे सुमारे 8 ते 9 प्रस्ताव संमत केले. त्यामुळे विरोधकांच्या गोंधळ आणि त्यानंतरच्या सभात्यागनंतर तब्बल 100 हून प्रस्तावांवर सभागृहात निर्णय घेण्यात आला.

महापौर आणि सभागृहनेत्यांचे सुत जुळेना

सभागृहात कामकाज करत असतानाच बहुतेक प्रस्ताव पुकारल्यानंतर सभागृह नेते हे गाेंधळलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे महापौरांकडून आज सभागृहनेत्यांचे लक्ष दिसत नाही, लक्ष विचलित आहे अशाप्रकारच्या कोटया करण्यात येत होत्या. तसेच यावेळी महापौरांनी, कामकाज इथे बसून करुन दाखवा अशीही कोटी केल्याने उपस्थित नगरसेवकांचेही कान टवकारले गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here