Home क्रीडा IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स

0
IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स
IND vs NZ 1st Test Live Streaming: भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्व डिटेल्स (Photo: ANI)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असलेली कसोटी मालिका भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. भारताने न्यूझीलंडला 2-0 ने मात दिली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटेल. असं असताना या मालिकेतील पहिला सामना 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. भारताने न्यूझीलंडला वनडे आणि टी20 मालिकेत पराभवाची धूळ चारली आहे. मात्र कसोटी सामन्यात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण न्यूझीलंडमधील खेळपट्टी आणि वातावरण वेगवान गोलंदाज आणि स्विंगला मदत करणारी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना या स्थितीचा सामना करणं आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडला मात देण्यासाठी योग्य रणनितीसह उतरावं लागणार आहे. भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीतही सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. चला जाणून घेऊयात हा सामना कुठे पाहता येईल आणि इतर बाबी

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी कधी आणि केव्हा खेळला जाणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान खेळला जाणार आहे.

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?

भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 3.30 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेकीचा कौल हा 3 वाज होईल.

https://www.prahaar.in/2026/11/18/arjun-tendulkar-has-been-retained-by-lucknow-super-giants-for-the-ipl-2027-tournament/

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 वर लाईव्ह पाहता येईल

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी ऑनलाईन कुठे पाहता येईल?

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना सोनी लिव एप आणि वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारताचा संघ: यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत, वाशिंग्टन सुंदर, अंशुल कंबोज, आकाश दीप, गुरनूर ब्रार

न्यूझीलंडचा संघ: टॉम लॅथम (कर्णधार), डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नाथन स्मिथ, मॅट हेनरी, काइल जॅमीसन, जॅकब डफी, ब्लेयर टिकनर, डीन फॉक्सक्रॉफ्ट आणि विल यंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here