Home ब्रेकिंग न्यूज अमिताभ बच्चन यांना धमकी देणाऱ्या गँगस्टरची लॉरेन्स टोळीकडूनच पोलखोल! ‘तो तर भांडी घासणारा भुरटा चोर’, अंडरवर्ल्डमध्ये मोठा भडका!

अमिताभ बच्चन यांना धमकी देणाऱ्या गँगस्टरची लॉरेन्स टोळीकडूनच पोलखोल! ‘तो तर भांडी घासणारा भुरटा चोर’, अंडरवर्ल्डमध्ये मोठा भडका!

0
अमिताभ बच्चन यांना धमकी देणाऱ्या गँगस्टरची लॉरेन्स टोळीकडूनच पोलखोल! ‘तो तर भांडी घासणारा भुरटा चोर’, अंडरवर्ल्डमध्ये मोठा भडका!
(Photo: AI Generated)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर धमकी दिल्यानंतर गँगस्टर गोल्डी ढिल्लन सध्या चर्चेत आला आहे. मात्र, आता खुद्द लॉरेन्स बिश्नोई टोळीनेच गोल्डी ढिल्लनविरोधात आघाडी उघडत त्याची संपूर्ण कुंडली जगासमोर मांडली आहे. लॉरेन्स टोळीचे कॅनडातील हँडलर मन्ना ब्रॅम्प्टन आणि माद्रिदमधील मंदीप स्पेन यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ढिल्लनवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या पोस्टमुळे गोल्डी ढिल्लनने लॉरेन्स बिश्नोई टोळीशी फारकत घेतल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जर्मनीत भांडी घासणारा भुरटा चोर!

लॉरेन्स टोळीच्या या दोन्ही सदस्यांनी ढिल्लनची खिल्ली उडवत सांगितले की, गोल्डी ढिल्लन हा जर्मनीतील एका हॉटेलमध्ये उदरनिर्वाहासाठी भांडी घासण्याचे काम करायचा. अमिताभ बच्चन तर दूरच, पण त्यांच्या घरच्या नोकरांनाही हात लावण्याची त्याची लायकी नाही, अशा शब्दांत त्यांनी ढिल्लनचा समाचार घेतला आहे. अमृतसरमध्ये ‘मॅड संधू’ या एलजीबीटीक्यू+ इन्फ्लुएन्सरच्या हत्येवरूनही त्यांनी ढिल्लनला फटकारले असून, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्याने बच्चन यांना धमकी दिल्याचे म्हटले आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगलींचा बदला घेण्याचा ढिल्लनचा दावा निव्वळ नौटंकी असल्याचे सांगत, पंजाबमध्ये त्याच्यावर चिट्टा (हेरोइन) विक्री आणि केबल वायर चोरल्याचे गुन्हे दाखल असल्याचा खुलासा टोळीने केला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/18/breach-of-trust-grandson-dupes-87-year-old-retired-naval-officer-siphons-off-29-5-lakh-with-friend/

हल्ल्यात चाकू घेऊन पळाला आणि विश्वासघातही केला!

जानेवारी महिन्यात जर्मनीमध्ये मन्ना ब्रॅम्प्टन आणि मंदीप स्पेन यांनी ढिल्लनवर हल्ला केला होता, ज्यातून तो कसाबसा बचावला. शस्त्रांच्या मोठ्या बाता मारणाऱ्या ढिल्लनकडे स्वतःच्या बचावासाठी केवळ एक साधा चाकू होता आणि तो जीव वाचवून तिथून पळून गेला, असा दावा टोळीने केला आहे. अंडरवर्ल्डमध्ये ढिल्लनचे नाव मोठे करण्यासाठी आपण कॅनडामध्ये मोफत 3 हत्या आणि 20-25 गोळीबाराच्या घटना घडवून आणल्याचे या दोघांनी सांगितले. मात्र, ढिल्लन अत्यंत मतलबी असून, गुंडांकडून कामे करून घेतल्यानंतर तो स्वतःच पोलिसांना टीप देऊन त्यांना अटक करायला लावायचा आणि ऑनलाइन पोस्ट टाकून गुन्ह्यांचे श्रेय घ्यायचा, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

समोरासमोर येण्याचे थेट आव्हान

अमिताभ बच्चन यांच्याविरोधातील सोमवारी केलेल्या पोस्टमध्ये ढिल्लनने लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेतले नव्हते, तर रॉकी पोर्तुगाल आणि सुमन जर्मनी यांची नावे घेतली होती. आता मन्ना ब्रॅम्प्टन आणि मंदीप स्पेन यांनी ढिल्लनला जगातील कोणत्याही देशात समोरासमोर येण्याचे थेट आव्हान दिले असून, इतरांनीही त्याच्याशी संबंध ठेवू नयेत, असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here