Home क्रीडा WTC 2025-27 Points Table: IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी गुणतालिकेत मोठा बदल; या दोन संघांना बसला फटका

WTC 2025-27 Points Table: IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी गुणतालिकेत मोठा बदल; या दोन संघांना बसला फटका

0
WTC 2025-27 Points Table: IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी गुणतालिकेत मोठा बदल; या दोन संघांना बसला फटका
WTC 2025-27 Points Table: IND vs NZ कसोटी मालिकेपूर्वी गुणतालिकेत मोठा बदल; या दोन संघांना बसला फटका (Photo: ICC/ANI)

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीची चुरस वाढली आहे. या स्पर्धत एकूण नऊ संघ होते आणि त्यापैकी चार संघांचा पत्ता कट झाला आहे. इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे संघ या स्पर्धेतून बाद झाले आहेत. त्यामुळे आता अंतिम फेरीसाठी भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात चुरस आहे. त्यामुळे भारत न्यूझीलंड कसोटी सामना खूपच महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील निर्णयावर भारताचं अंतिम फेरीचं गणित ठरणार आहे. त्यामुळे ही मालिका भारताला काहीही करून 2-0 ने जिंकणं भाग आहे. असं असताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत या सामन्यापूर्वी एक उलटफेर झाला आहे. या स्पर्धेच्या शर्यतीतून आऊट झालेल्या दोन संघांना फटका बसला आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मात्र या कसोटी मालिकेतील सामन्यात संथ गतीने गोलंदाजी केल्याने आयसीसीने या दोन्ही संघांचे गुण कापले.

श्रीलंका आणि पाकिस्तानचे किती गुण कापले?

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना रावलपिंडी येथेत खेळला गेला. हा सामना ड्रॉ झाला पण दोन्ही संघाना संथ गोलंदाजीसाठी दंड ठोठावला गेला. दोन्ही संघांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील गुण कापले गेला. श्रीलंकेचा संघ 15 षटकं मागे होता, म्हणून 15 गुण आणि पाकिस्तानचा संघ पाच षटकं मागे होता म्हणून 5 गुण कापले. श्रीलंकेला यामुळे जबर फटका बसला असून थेट आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. श्रीलंकेची विजयी टक्केवारी 33.33 टक्क्यावरून 15.47 टक्के झाली आहे. तर पाकिस्तान 3.33 टक्के विजयी टक्केवारीसह सर्वात शेवटी म्हणजेच नवव्या स्थानावर आहे.

https://www.prahaar.in/2026/11/17/big-names-including-head-and-mitchell-starc-released-ahead-of-the-ipl-auction-2027-see-the-list-for-all-10-teams/

भारत पाकिस्तानची स्थिती काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ 72.22 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ 51.52 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले तर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेण्याची संधी मिळेल. भारताची विजयी टक्केवारी 58.97 टक्के होईल. तर न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरेल. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 54.17 टक्के होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here