Home महाराष्ट्र नाशिक नाशिकमध्ये भीषण अपघात ! सातपूरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू

नाशिकमध्ये भीषण अपघात ! सातपूरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू

0
नाशिकमध्ये भीषण अपघात ! सातपूरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू

नाशिक : शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (दि. 17) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. महिंद्रा सोना कंपनीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागला आहे.

अपघातात राजेश भोये यांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा सोना कंपनीजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात राजेश कृष्णा भोये यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या धनंजय समाधान पगार (वय 21, रा. सातपूर) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली.

https://www.prahaar.in/2026/11/18/ashok-kharat-case-major-development-in-the-ashok-kharat-case-court-issues-a-warning-to-the-defense-in-connection-with-a-42-crore-irregularity-crucial-hearing-set-for-november-30/

सातपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here