Home ताज्या घडामोडी iPhone युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! Apple ची सेवा ठप्प, कोणकोणत्या देशांना बसला फटका?

iPhone युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! Apple ची सेवा ठप्प, कोणकोणत्या देशांना बसला फटका?

0
iPhone युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! Apple ची सेवा ठप्प, कोणकोणत्या देशांना बसला फटका?
आयफोन युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! Apple ची सेवा ठप्प, कोणकोणत्या देशांना बसला फटका? फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेक्नोलॉजी संबंधित नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अलीकडेच नोकरदारांची मायक्रोसॉफ्ट 365 मुळे ऑफिसमधील रखडली असताना आता कदाचित ॲपलमुळे आता ऑफिसमधील किंवा तुमची काही खासगी कामं रखडण्याची शक्यता आहे. ॲपलच्या अनेक ऑनलाइन सेवांमधील तांत्रिक बिघाड आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (NSA) गोपनीय कम्युनिकेशन नेटवर्कमधील व्यत्ययांमुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, सायबर सुरक्षा संशोधकांनी 178 संस्थांच्या वेबसाइट्सवर धोकादायक स्क्रिप्ट्स उघडकीस आणल्या आहेत. मॅरियटच्या हॉटेल प्रणालीमध्येही तांत्रिक समस्यांच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

या सर्व घटनांदरम्यान, दुवा म्हणून कोणताही सायबर हल्ला किंवा एकच तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनेक प्रकरणांमध्ये, संबंधित कंपन्या आणि अधिकाऱ्यांनी सायबर हल्ल्यांची शक्यता नाकारली आहे. या वारंवार होणाऱ्या व्यत्ययांमुळे डिजिटल सेवा आणि एकमेकांशी जोडलेल्या तंत्रज्ञान प्रणालींवरील निर्भरतेवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत आहे. जगभरातील सोशल मिडिया युजर्स व्हाईट हाऊसकडून या अनियमिततेचे खरे कारण स्पष्ट करावे अशी मागणी करत आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/17/missile-attack-on-tara-gas-tanker-in-strait-of-hormuz-over-22-crew-members-safe-sparks-international-concern/

अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवारी, हजारो ॲपल युजर्सला विविध ॲपल सेवा वापरताना समस्यांचा सामना करावा लागला आहे. ॲपल युजर्सला आयक्लॉड, ॲप स्टोअर, ॲपल पे आणि ॲपल सपोर्ट वापरताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. अनेक युजर्स त्यांच्या ॲपल अकाऊंटवर रिलॉग इन करू शकले नाहीत. काहींना क्लाउड सेवा वापरताना आणि नवीन उपकरणे सक्रिय करतानाही अडचणी आल्या आहेत. डाउनडिटेक्टर या आउटेज मॉनिटरिंग वेबसाइटवर, अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजेच्या सुमारास तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

ॲपल वॉलेट आणि ॲपल म्युझिकच्या युजर्सनेही तक्रारी नोंदवल्या आहे. अनेक युजर्सने अशी सुद्धा तक्रार केली आहे की, आमच्या फोनमध्ये आधीच लॉगईन असताना अचानक लॉग आऊट झाले. पुन्हा लॉग इन करत असताना आम्हाला कनेक्शन एरर आणि व्हेरिफिकेशन करताना समस्या जाणवत आहेत. ही समस्या अमेरिकेसह ब्राझील, ग्रीस आणि लाटव्हियामधील युजर्सनेही तक्रारी नोंदवल्या आहेत. सुरुवातीला, ॲपलच्या सिस्टम स्टेटस पेजवर अनेक सेवा सामान्यपणे सुरू असल्याचे दिसत होते, परंतु नंतर कंपनीने ॲपल म्युझिक, ॲप स्टोअर आणि ॲपल केअरमध्ये व्यत्यय येत असल्याचे स्पष्ट केले.

https://www.prahaar.in/2026/11/17/pm-modi-very-tough-man-says-donald-trump-on-sidelines-of-asean-summit/

आयक्लॉडच्या साइन-इन सिस्टममध्येही समस्या येत असल्याची माहिती ॲपलकडून देण्यात आली. नंतर ॲपलने स्पष्ट केले की, एका अंतर्गत सॉफ्टवेअर अपडेटमुळे त्यांच्या काही सेवांवर परिणाम झाला होता. कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक सिस्टीम पुन्हा सुरू झाल्या असून इतर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ॲपलची सिस्टिम डाऊन झाली, यामध्ये कोणताही सायबर हल्ला नव्हता. दरम्यान, या सेवेचा भारताला सध्या तरी कोणताही फटका बसलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here