मोबाईलच्या हप्त्यांवरून झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. आयफोनच्या ईएमआयचे हप्ते भरण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची त्याच्याच मित्राने हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह शाळेच्या मागील बाजूला असलेल्या झुडपांमध्ये टाकून दिला. या प्रकरणाचा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उलगडा केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.
आयफोनच्या हप्त्यांवरून सुरू झाला वाद
प्रतीक अंबवले (23) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, प्रतीक जाधव (30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रतीक अंबवले याने आयफोन खरेदी केला होता. या खरेदीच्या व्यवहारामध्ये त्याने प्रतीक जाधवचा मोबाईल क्रमांक पर्यायी संपर्क क्रमांक म्हणून दिला होता. मात्र, आयफोनचे ईएमआयचे हप्ते वेळेवर भरले जात नसल्याने फायनान्स कंपनीकडून जाधवला वारंवार फोन येत होते. या सततच्या फोनमुळे जाधव त्रस्त झाला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.(Panvel)
https://www.prahaar.in/2026/11/17/manu-bhaker-makes-big-impact-outside-shooting-range-gets-major-global-responsibility-to-frame-rules/
वादातून मित्राचीच हत्या केल्याचा आरोप
7 नोव्हेंबर रोजी दोघांची भेट झाली. यावेळी आयफोनच्या थकित हप्त्यांवरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपी प्रतीक जाधवने अंबवलेवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अंबवलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह शिवकर गावातील एका शाळेच्या मागील बाजूला असलेल्या झुडपांमध्ये टाकून दिला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.(PanvelNews)
https://www.prahaar.in/2026/11/17/promoting-fodder-cultivation-through-the-employment-guarantee-scheme-to-overcome-fodder-scarcity/
मोबाईल कॉल डिटेल्समुळे हत्येचा उलगडा
दरम्यान, प्रतीक अंबवले 7 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणाचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासले. यामध्ये बेपत्ता होण्यापूर्वी अंबवलेचा शेवटचा संपर्क प्रतीक जाधवशी झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा संशय जाधववर गेला. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली असता या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
17 नोव्हेंबरला झुडपांमध्ये आढळला मृतदेह
पोलिसांनी 17 नोव्हेंबर रोजी शिवकर परिसरातील झुडपांमधून प्रतीक अंबवलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रतीक जाधवला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आयफोनच्या ईएमआयच्या पैशांवरून सुरू झालेल्या वादाचा शेवट एका तरुणाच्या मृत्यूने झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत.(iPhoneEMI)