Home ब्रेकिंग न्यूज Uniform Cibil Code: समान नागरी कायद्यावर मुंबईत जनसुनावणी; नागरिकांना मते मांडण्याची संधी!

Uniform Cibil Code: समान नागरी कायद्यावर मुंबईत जनसुनावणी; नागरिकांना मते मांडण्याची संधी!

0
Uniform Cibil Code: समान नागरी कायद्यावर मुंबईत जनसुनावणी; नागरिकांना मते मांडण्याची संधी!

समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांचे विचार आणि मते जाणून घेण्यासाठी कोकण विभागात विभागीय स्तरावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती महाराष्ट्रात महसूल विभागनिहाय हो जनसुनावणी घेत आहे. कोकण महसूल विभागांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० या वेळेत नियोजन हॉल, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर (जुने जकात घर, फोर्ट, मुंबई) येथे विशेष जनसुनावणी होणार आहे

ही समिती कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून, तेथे येणाऱ्या नागरिकांची सुनावणी थेट समितीसमोर होईल. जे नागरिक नवी मुंबई येथे प्रत्यक्ष जाऊ शकणार नाहीत, त्यांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निर्धारित वेळेच्या एक तास आधी उपस्थित राहावे, तेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची सुनावणी घेतली जाईल.

https://www.prahaar.in/2026/11/17/job-opportunity-in-a-government-organization-salary-up-to-80000-heres-how-to-apply/

या जनसुनावणीमध्ये विवाह, घटस्फोट, सहजीवन (लिव्ह-इन) नातेसंबंध, भरण-पोषण, पालकत्व, वारसाहक्क आणि उत्तराधिकारी हक्क या प्रमुख विषयांवर नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. ज्या नागरिकांना सुनावणीस प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही, ते महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टलवर ३७ मु‌द्द्यांच्या आधारे आपली मते आणि माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. संबंधित गट, संस्थांचे प्रतिनिधी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here