नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीतील विवेक विहार (Vivek Vihar) भागात एका जुन्या दुमजली (Ground + 2) घराची छत अचानक कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नक्की काय घडली घटना ?
https://www.prahaar.in/2026/11/17/jijai-movie-bollywood-also-impressed-after-watching-the-trailer-for-jijai-the-film-is-set-to-release-on-november-20th/
आज सकाळी साधारण साडेदहा-अकराच्या सुमारास हा अपघात झाला. घर जुने असल्यामुळे त्याची रचना कमजोर झाली असावी, ज्यामुळे अचानक स्लॅब किंवा छत खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तात्काळ पावले उचलली.
अडकलेल्या लोकांना काढले बाहेर
घटनची माहिती मिळताच अग्निशामक दल (Fire Brigade) आणि बचाव पथकाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य राबवून मलब्यात अडकलेल्या काही जखमी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रशासन सतर्क, तपास सुरू
सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पोलीस आणि आपत्कालीन पथक मलब्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेत आहे. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.