Home क्रीडा मैदानावर पुन्हा ‘स्काय’ शो! अवघ्या 29 चेंडूंत 82 धावा कुटत मुंबईला मिळवून दिला विजय

मैदानावर पुन्हा ‘स्काय’ शो! अवघ्या 29 चेंडूंत 82 धावा कुटत मुंबईला मिळवून दिला विजय

0
मैदानावर पुन्हा ‘स्काय’ शो! अवघ्या 29 चेंडूंत 82 धावा कुटत मुंबईला मिळवून दिला विजय
सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाबाहेर आहे आणि संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. असं असताना पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या नशिबाची पारख करत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी त्याने आपल्या बॅटने पुन्हा एकदा बोलण्यास सुरूवात केली आहे. (Photo: Instagram)
सूर्यकुमार यादवने गुजरात विरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत 82 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 7 षटकार आणि 9 चौकार मारले. सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट 282हून अधिकचा राहिला. त्याच्या एका खेळीमुळे मुंबईने 198 धावांचं लक्ष्य फक्त 15.4 षटकात पूर्ण केलं. (Photo: Instagram)
गुजरातने दिलेलं लक्ष्य गाठताना मुबई अवघ्या दोन षटकात 2 विकेट गमावल्या होत्या. अंगकृष रघुवंशी 4 आणि मुशीर खान 14 धावा करून बाद झाले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आला आणि तिसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकून टेन्शन रिलीज केलं. (Photo: Instagram)
सूर्यकुमार यादवने यानंतर आपला झंझावात सुरूच ठेवला आणि अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतरही त्याने आक्रमण सुरूच ठेवलं आणि मुंबईला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. (Photo: Instagram)
सूर्यकुमार यादवने यापूर्वी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 21 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने या स्पर्धेतील दोन सामन्यात 50 चेंडूत 12 षटकार आणि 15 चौकार मारले आहेत. त्यामुळे निवडकर्त्यांना टीम इंडियात त्याला स्थान देण्यासाठी विचार करावा लागणार आहे. (Photo: Instagram)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here