Home ब्रेकिंग न्यूज Pandharpur News : पंढरपूरच्या आंबे गावातील विहीर दुर्घटना; दोन मजुरांचे मृतदेह बाहेर, आणखी दोघांचा शोध सुरू

Pandharpur News : पंढरपूरच्या आंबे गावातील विहीर दुर्घटना; दोन मजुरांचे मृतदेह बाहेर, आणखी दोघांचा शोध सुरू

0
Pandharpur News : पंढरपूरच्या आंबे गावातील विहीर दुर्घटना; दोन मजुरांचे मृतदेह बाहेर, आणखी दोघांचा शोध सुरू

Solapur News: पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात विहिरीचा ढिगारा कोसळून चार मजूर गाडले गेल्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत दोन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाने आज पहाटे मंगेश मोरे यांचा मृतदेह बाहेर काढला. यापूर्वी सिद्धेश्वर घाडगे यांचा मृतदेह सापडला होता. उर्वरित आबा घोडके आणि तानाजी घोडके या दोन मजुरांचा शोध अद्याप सुरू आहे.

https://www.prahaar.in/2026/11/16/farmers-if-you-want-to-receive-funds-from-government-schemes-in-your-account-complete-your-e-kyc-and-farmer-id/

दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू

15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेली बचाव आणि शोधमोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. रात्री उशिरा NDRF च्या पथकाने पहिला मृतदेह बाहेर काढला होता. त्यानंतर आज पहाटे आणखी एका मजुराचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मृतदेह सापडलेले सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे हे रांजणी गावातील रहिवासी होते. तर आणवली गावातील आबा घोडके आणि तानाजी घोडके यांचा शोध सुरू आहे.

आंबे गावात नेमकी दुर्घटना कशी घडली?

पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतातील विहिरीचे काम पूर्ण झाले होते. या सुमारे 50 फूट खोल विहिरीचे मोजमाप घेण्याचे काम सुरू असताना अचानक ढिगारा कोसळला. त्यावेळी विहिरीत उतरलेले चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. सुरुवातीला स्थानिक पातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाकडून ढिगारा हटवून उर्वरित दोन मजुरांचा शोध घेतला जात आहे.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांची नावे

  • आबा घोडके – आणवली, ता. पंढरपूर
  • तानाजी घोडके – आणवली, ता. पंढरपूर
  • सिद्धेश्वर घाडगे – रांजणी, ता. पंढरपूर
  • मंगेश मोरे – रांजणी, ता. पंढरपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here