Home ताज्या घडामोडी आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही

आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही

0
आधार कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलायचा; तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
smartphone charging 4
आधार कार्डवरील मोबाईल नंबर बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी अनेकदा लोकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते आणि लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागते. परंतु, तुम्ही हेच काम आता अवघ्या काही मिनिटामध्ये करू शकणार आहेत. मोबाईल ॲपच्या मदतीने तुम्ही घरबसल्याच आधार कार्डवरील मोबाईल नंबर अपडेट करू शकणार आहेत.
अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी अधिकृत आधार ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. हे ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करून कोणीही सहज वापरू शकतो. पूर्वी लोकांना आधार सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागत असे, परंतु आता या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचत आहे.
सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये आधार ॲप इन्स्टॉल करून आपल्या आधार कार्डच्या तपशीलांच्या मदतीने लॉगिन करा ॲप लॉग ईन करा. ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर खालील बाजूला ‘सर्व्हिस’ (Service) पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
सर्व्हिसच्या आत तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यावर स्क्रीनवर संपूर्ण प्रक्रिया, पायऱ्या आणि सर्वात खाली ‘कंटिन्यू टू अपडेट मोबाईल नंबर’ असा पर्याय येईल.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला जेमतेम 5 मिनिटांचा वेळ लागेल. युजर्सला ओटीपीच्या माध्यमातून आपला मोबाईल नंबर पडताळवावा लागतो. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागते. शेवटी तुम्हाला ऑनलाइन 75 रुपयांची फी भरावी लागेल.
पेमेंट यशस्वी झाल्यानंतर साधारण 15 दिवसांच्या प्रोसेसिंग टाईममध्ये तुमच्या आधार कार्डवर नवीन मोबाईल नंबर अपडेट होऊन जातो. आता हे सर्व काम तुम्ही कोणताही त्रास न होता, घरबसल्या आपल्या मोबाईलवरून करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here