Home देश Delhi Red Fort bomb blast : ‘स्फोटाशी आमचा संबंध नाही’; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचा न्यायालयात दावा!

Delhi Red Fort bomb blast : ‘स्फोटाशी आमचा संबंध नाही’; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचा न्यायालयात दावा!

0
Delhi Red Fort bomb blast : ‘स्फोटाशी आमचा संबंध नाही’; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचा न्यायालयात दावा!
Photo : ANI

लाल किल्ला स्फोट प्रकरणात अटक केलेल्या आरोपींवरील आरोप निश्चितीसंदर्भात दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात आरोपी डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन सईद यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. इतर आरोपींचा युक्तिवाद १७ नोव्हेंबर रोजी सादर केला जाईल. आरोपी डॉ. मुजम्मिल आणि डॉ. शाहीन सईद यांनी सांगितले की लाल किल्ला स्फोटात त्यांचा कोणताही सहभाग नव्हता आणि स्फोटात सामील असलेल्या आरोपींशी त्यांच्या संपर्काचा कोणताही पुरावा नाही

१० नोव्हेंबर २०२५ रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या आणि ज्यात अनेक लोकांचा मृत्यू व दुखापत झाली होती, त्या दिल्ली लाल किल्ला स्फ़ोटामागील कटात सामील असल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद यांचा बचावाचा युक्तिवाद राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी ऐकला. बचाव पक्षाच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, स्फोटात वापरलेल्या गाडीच्या खरेदीत मुजम्मिल शकील आणि शाहीन सईद यांचा कोणताही सहभाग नव्हता आणि त्यांचा इतर आरोपींशी कोणताही संपर्क नव्हता.

https://www.prahaar.in/2026/11/14/indias-condition-for-the-return-of-sheikh-hasina-what-will-bangladesh-have-to-do/

बचाव पक्षाच्या वकिलाने यावर जोर दिला की शकीलला ३० ऑक्टोबर रोजी कार खरेदी केल्यानंतर आणि १० नोव्हेंबरच्या स्फोटापूर्वी, २९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. स्फोटाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये शकील दिसला नाही, तर उमर उन नबी, अमीर रशीद आणि जसीर बिलाल वानी दिसले होते. स्फोटांच्या एक दिवस आधी, ९ नोव्हेंबर रोजी शाहीन सईदला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लखनौमध्ये अटक केली. उमर उन नबी आणि अमीर रशीद यांना शकीलच्या अटकेबद्दल माहिती होती का, असा प्रश्न बचाव पक्षाने उपस्थित केला आणि या कटाशी त्यांच्या कथित संबंधांना आव्हान दिले.

दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेने या प्रकरणात ११ जणांविरुद्ध आरोप लावले आहेत. यातील एक आरोपी उमर उन नबी याचा स्फोटातच मृत्यू झाला होता. आणखी दोन जणांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी बंद दालनात युक्तिवाद ऐकला. बचाव पक्षाच्या वतीने वकील एम. एस. खान, राहुल साहनी आणि जहबी तिहामी यांनी काम पाहिले, तर एनआयएच्या वतीने वरिष्ठ वकील माधव खुराना यांनी बाजू मांडली. आरोप निश्चित करण्यासाठी आणि आरोपींमधील कट सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here