सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यापैकी काही व्हिडिओ अंगावर काटा आणणारे असतात, तर काही मन जिंकून घेणारे असतात. सद्यस्थितीत असाच एक अत्यंत थरारक आणि त्याच वेळी भावुक करणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. प्राणीसंग्रहालयात फिरताना एक लहान मुलगी अचानक पांडाच्या पिंजऱ्यात जाऊन पडली. पिंजऱ्यात वन्य प्राणी असल्यामुळे उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला, मात्र त्यानंतर त्या पांडाने जे केले, ते पाहून जगभरातील लोकांचे डोळे विस्फारले आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/14/nashik-crime-minor-girl-missing-for-13-days-rescued-in-nashik-34-year-old-married-man-from-mumbai-arrested/
काय घडलं नेमकं ?
छोटी बच्ची फिसलकर पांडा के सामने गिर गई , उसके बाद पांडा ने बच्ची के साथ जो किया आप देखकर रह जाएंगे हैरान https://t.co/qfTQjntUtB
— RAO SAHAB (@raosahab3101990) November 11, 2026
प्राप्त माहितीनुसार, ही घटना परदेशातील एका प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयातील (झू) आहे. जिथे मोठ्या संख्येने पर्यटक पांडाला पाहण्यासाठी जमले होते. गर्दीमध्येच एक लहान मुलगी खेळत असताना अचानक तोल जाऊन थेट पांडाच्या इनक्लोजरमध्ये (पिंजऱ्यात) खाली पडली. आपल्या डोळ्यांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या आणि विशेषतः त्या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. लहान मूल आणि त्यातही वन्य प्राण्याचा सहवास, यामुळे मोठा अनर्थ ओढवल्याची भीती सर्वांनाच वाटू लागली.
पांडा दिसायला गोड असला तरी एक वन्य जीव!
जरी पांडा हा दिसायला अत्यंत शांत, बाभड्या आणि लाघवी दिसत असला, तरी तो मूळचा एक वन्य प्राणी आहे. अशा हिंस्त्र किंवा वन्य प्राण्यांच्या पिंजऱ्यामध्ये एखादे लहानगं मूल कोसळणे म्हणजे अत्यंत जीवघेणा प्रसंग मानला जातो. पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली ती चिमुकली खाली पडताच अवघ्या काही सेकंदात सर्वांचे लक्ष तिकडे वेधले गेले. आता हा पांडा त्या मुलीवर हल्ला तर करणार नाही ना, या विचाराने सर्वजण प्रचंड धास्तावले होते.
https://www.prahaar.in/2026/11/14/cm-yogi-meerut-ex-servicemen-reunion-modi-govt-terror-attack-operation-sindoor/
पांडाचे अप्रतिम वर्तन अन् पालकांकडे सुखरूप सुपूर्द
मात्र, या संपूर्ण प्रसंगात त्या पांडाने जी बुद्धिमत्ता आणि संयम दाखवला, त्याने साऱ्यांच्याच अंगावर आनंदाचे आणि आश्चर्याचे मोरपीस फिदरले. पांडाने त्या चिमुकलीवर कोणताही हल्ला केला नाही किंवा तिला कोणतीही इजा पोहोचवली नाही. उलट, अत्यंत प्रेमाने आणि काळजीपूर्वक त्याने त्या मुलीला उचलले आणि तिचे पालक ज्या बाजूला होते, त्या दिशेने तिला सुखरूप परत केले. हा अत्यंत दुर्मिळ आणि थरारक क्षण कॅमेऱ्यात अचूक कैद झाला, जो आज इंटरनेटवर लाखो लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
सोशल मीडियावर युजर्सकडून भावनांचा वर्षाव
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर नेटिझन्सकडून जोरदार प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले, “प्राण्यांमध्ये कधीकधी माणसांपेक्षा जास्त सहनशीलता आणि प्रेम असते. एका निरागस मुलीला पाहून पांडाने तिच्याशी जनावरासारखा नाही तर मित्रासारखा व्यवहार केला, आपण माणसांनीही यातून शिकायला हवे.” दुसऱ्या एका युजरने पालकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, “पालकांनी आपल्या मुलांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जर तिथे पांडाऐवजी दुसरा एखादा हिंस्त्र प्राणी असता, तर मोठा अनर्थ घडला असता. पण सुदैवाने पांडाने देवदूताचे काम करत त्या चिमुकलीचा जीव वाचवला.” तर अनेकांनी या पांडाच्या समजूतदारपणाचे भरभरून कौतुक केले असून, या घटनेने पुन्हा एकदा मानवी संवेदना आणि प्राण्यांमधील जिव्हाळ्याची चर्चा सुरू केली आहे.