Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या कामगिरीचे स्थायी समितीत कौतुक, एवढ्या आगी तरीही शर्थीने केला प्रयत्न

Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या कामगिरीचे स्थायी समितीत कौतुक, एवढ्या आगी तरीही शर्थीने केला प्रयत्न

0
Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलाच्या कामगिरीचे स्थायी समितीत कौतुक, एवढ्या आगी तरीही शर्थीने केला प्रयत्न

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईत ऐन दिवाळीमध्ये आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ हाेवून यामध्ये विशेषत: फटाक्यांमुळे लागलेल्या आगींचा मोठ्याप्रमाणात समावेश होता. तरीही मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांसह अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करत प्रत्येक आगींवर त्वरीत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत अग्निशमन दलाच्या या कामगिरीचे कौतूक करण्यात आले.

https://www.prahaar.in/2026/11/13/1074648shocking-threat-to-blow-up-6-banks-in-mumbai-with-bombs-panic-ensues-after-simultaneous-receipt-of-e-mails/

मुंबईत दिवाळीच्या काळात मंगळवारपर्यंत एकूण ४९९ आगीच्या घटना घडल्या. यामध्ये ३३३ आगी या फटाक्यांमुळे लागल्या आणि यामध्ये दोन जणांचा मृत्यू तसेच ८ जण जखमी झाले होते. अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांच्या कामगिरीबाबत स्थायी समितीत कौतुकाची थाप मारण्यात आली. सभागृहनेते गणेश खणकर यांनी अग्निशमन दलाच्या कामगिरीचे कौतून करत एकाच दिवशी विविध ठिकाणी रात्री अपरात्री आगीच्या घटना घडल्यानंतरही प्रत्येक वर्दीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केल. प्रत्येक आगीच्या वर्दीमुळे या विभागाच्या जवान आणि अधिकाऱ्यांवर ताण आलेला असतानाही प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले आणि आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

यावर बोलतांना काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी आगीची आकडेवारी देत राजकारणामुळे या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सांगत दिया मिर्झा यांच्या पर्यावरणबाबत संदेशाचा जोड देत भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे नाव घेण्याचा प्रयत्न केला. अमित साटम यांचे नाव घेताच भाजपचे तेजिंदरसिंग तिवाना, प्रिती सातम, शीतल गंभीर, राजेश्री शिरवडकर, प्रकाश दरेकर यांनी जोरदार हरकत घेत आधी माफी मागावी नंतरच बोलावे अशी मागणी करत आझमी यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे बराच वेळ यावर गोंधळ सुरु झाल्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्षांनी मूळ प्रस्ताव पुकारत कामकाजाला सुरुवात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here