Home ताज्या घडामोडी Kiara Advani News: ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवर सिद्धार्थची प्रतिक्रिया; कियाराने केला खुलासा!

Kiara Advani News: ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवर सिद्धार्थची प्रतिक्रिया; कियाराने केला खुलासा!

0
Kiara Advani News: ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवर सिद्धार्थची प्रतिक्रिया; कियाराने केला खुलासा!

‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा अडवाणी अभिनेता यशसोबत केलेल्या इंटिमेट सीनमुळे प्रचंड ट्रोल झाली होती. चित्रपटातील ‘तबाही’ गाण्यातील दोघांचे इंटिमेट सीन्स समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. तर काही युजर्सनी कियाराच्या वैयक्तिक आयुष्यातील संदर्भ देत तिच्यावर टीका केली होती. यावर आता पती सिद्धार्थ मल्होत्राची प्रतिक्रिया आणि चित्रपटाच्या सुरुवातीच्या प्रतिसादाबद्दल कियाराने आपली भूमिका मांडत स्पष्ट केले आहे.

नुकताच ‘कॉफी विथ करण सीझन 9’ अभिनेत्री कियारा अडवाणी पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत सहभागी झाली होती. यावेळी तिने अनेक विषयांवर भाष्य केले. ‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सवरून देखील तिने आपले मत मांडले आहे.

https://www.prahaar.in/2026/11/12/free-bus-service-in-delhi-good-news-for-passengers-in-delhi-free-bus-service-from-november-to-january-the-government-is-preparing-to-take-a-major-decision-soon/

कियारा अडवाणी नेमकं काय म्हणाली?
‘टॉक्सिक’मधील इंटिमेट सीन्सचा सिद्धार्थवर कोणताही परिणाम झाला नाही. असे तिने सांगितले. तसेच या प्रसंगाबाबत बोलताना, त्याला काहीही फरक पडला नाही आणि दोघांमध्ये यावर कधी चर्चा देखील झाली नाही, असे कियाराने स्पष्ट केले. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेपेक्षा त्यांच्या नात्यातील विश्वास आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असल्याचे तिने यावरून नमूद केले.

पुढे बोलताना, ‘तबाही’ गाण्यातील दृश्यांवरून काही नेटकऱ्यांनी कियाराला लक्ष्य केले होते. त्यावर ती विवाहित आहे आणि आईदेखील आहे, अशीही टीका काही युजर्सने केली होती. मात्र, अशा टीकेमागे महिलांसाठी वेगळे निकष लावण्याची मानसिकता असल्याचे कियाराने अधोरेखित केले. महिला कलाकारांना त्यांच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्याच्या आधारे तपासले जाते, असे तिचे म्हणणे होते. ऐश्वर्या राय बच्चन यांच्या काळापासून अशा दुहेरी निकषांचा अनुभव अभिनेत्री घेत आल्याचे तिने यावेळी सांगितले. तसेच या टीकेला, स्वतःहून स्पष्टीकरण देण्याची गरज कियाराला वाटली नाही. त्यामुळे प्रत्येक आरोपाला प्रतिक्रिया देण्याऐवजी आपले काम बोलू द्यावे, अशी भूमिका तिने घेतली.

दरम्यान, ‘टॉक्सिक’च्या सुरुवातीच्या प्रतिसादामुळे कियारा निराशा देखील झाली होती. पहिल्या विकेंडमध्ये प्रेक्षकांकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्याने ती खूप खचली होती. चित्रपटाच्या सुरुवातीच्या कमाईनंतर मिळालेला प्रतिसाद तिच्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी धक्कादायक ठरला. त्यामुळे केवळ पहिल्या विकेंडच्या प्रतिसादावर कलाकाराच्या कामाचे मूल्य ठरवता येत नाही, हे तिला यातून समजले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here