Home ताज्या घडामोडी O Saathi Re Web Series: इम्तियाज अली,अदिती राव यांची ‘ओ साथी रे’ वेब सिरीज नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी प्रदर्शित

O Saathi Re Web Series: इम्तियाज अली,अदिती राव यांची ‘ओ साथी रे’ वेब सिरीज नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी प्रदर्शित

0
O Saathi Re Web Series: इम्तियाज अली,अदिती राव यांची ‘ओ साथी रे’ वेब सिरीज नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी प्रदर्शित

O Saathi Re Web Series: चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांची एक नवीन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पडद्यावर प्रेम, प्रणय आणि स्नेह यांचे चित्रण करण्यासाठी इम्तियाज अली ओळखले जातात. ‘ओ साथी रे’ असे या वेबसीरिजचे नाव आहे. नात्यांमधील गुंतागुंतीच्या भावनांचा शोध घेते, जिथे प्रेम कधीच समान नसते. या सीरिजमध्ये आदिती राव हैदरी, अविनाश तिवारी आणि अर्जुन रामपाल देखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘ओ साथी रे’च्या ओटीटी सिरीजच्या प्रदर्शनाची तारीख 4 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.

https://www.prahaar.in/2026/11/11/pravin-tarde-birthday-he-is-a-blockbuster-he-is-a-dialogue-master-viju-manes-special-post-on-the-occasion-of-pravin-tardes-birthday/

‘ओ साथी रे’चे लेखन आणि निर्मिती इम्तियाज अली यांनी केली असून, आरिफ अली याचे दिग्दर्शन करत आहेत. इम्तियाज अली, मोहित चौधरी आणि शिबाशिष सरकार यांनी या वेब सीरिजची निर्मिती ‘विंडो सीट फिल्म्स’ या बॅनरखाली केली आहे. ही सिरीज तुम्हाला पुढच्या महिन्यात 4 डिसेंबर 2026 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

कथा आणि कथानक

कथेबद्दल बोलायचं झालं तर, ही वेब सिरीज घटस्फोट घेणार असलेल्या एका जोडप्याची आहे, पण त्यांचे प्रेम पुन्हा बहरते. यात प्रेमातील असमतोलशी झगडणारी सखोल आणि बहुआयामी पात्रे आहेत. ही कथा भावनांचा नाजूक समतोल, स्वतःची ओळख आणि वैयक्तिक इच्छांचा शोध, नात्यांमधील सत्तेचे समीकरण आणि एकमेकांना समजून घेणे यांसारख्या विषय मांडण्यात आला आहे. निर्मात्यांच्या मते, ही सिरीज प्रेमावर एक परिपक्व दृष्टिकोन सादर करते, जो पारंपरिक प्रेमकथेच्या पलीकडचा आहे.

यावर बोलतांना, इम्तियाज अली यांनी सांगितले की, कधीकधी ‘आदर्श जोडपे’ म्हणणे ओझे वाटू शकते. “ही एक आधुनिक रोमँटिक मालिका आहे, जिचे हृदय मात्र जुन्या काळाशी जोडलेले आहे. कधीकधी प्रेम तुम्हाला आश्चर्यचकित करते. ते अशा ठिकाणी सापडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ही कथा अशा एका जोडप्याची आहे, जे घटस्फोट घेणार असतात, पण त्यांचे प्रेम पुन्हा बहरते. प्रेमाला धडधडणारे हृदय असते. प्रेम सुंदर आहे, पण नात्यात दोन्ही पक्षांनी समान योगदान द्यावेच असे नाही. ‘आदर्श जोडपे’ म्हटले जाणे हे कधीकधी एक ओझे देखील ठरू शकते.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here