Home क्राईम QR Code Fraud : ‘अरे.. स्कॅम झालाय!’ मिठाईच्या दुकानात QR कोडची केली अदला बदल, ग्राहकांचे पैसे लंपास; व्हिडिओ व्हायरल

QR Code Fraud : ‘अरे.. स्कॅम झालाय!’ मिठाईच्या दुकानात QR कोडची केली अदला बदल, ग्राहकांचे पैसे लंपास; व्हिडिओ व्हायरल

0
QR Code Fraud  : ‘अरे.. स्कॅम झालाय!’ मिठाईच्या दुकानात QR कोडची केली अदला बदल, ग्राहकांचे पैसे लंपास; व्हिडिओ व्हायरल

Crime News: दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत एका तरुणाने मिठाईच्या दुकानातील पेमेंट QR कोड बदलून ग्राहकांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील गोंडा येथे उघडकीस आला आहे. ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर त्यांना पेमेंट यशस्वी झाल्याचा संदेश मिळत होता. मात्र, ही रक्कम दुकानदाराच्या खात्यात जमा होण्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जात होती. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला.

https://www.prahaar.in/2026/11/12/mcoca-invoked-against-drug-kingpin-tipus-gang-in-kandivali-three-associates-arrested-17-cases-registered/

गर्दीचा फायदा घेत QR कोड बदलला

ही घटना दिवाळीच्या दिवशी नगर कोतवाली परिसरातील एका मिठाईच्या दुकानात घडली. दुकानदार ओमी सिंधी यांच्या म्हणण्यानुसार, सणामुळे दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होती. याच वेळी लाल शर्ट घातलेला एक तरुण दुकानात आला. त्याने संधी साधून दुकानाच्या पेमेंट स्कॅनरवरील मूळ QR कोडवर स्वतःचा QR कोड चिकटवला.

त्यानंतर ग्राहक दुकानातील QR कोड स्कॅन करून पैसे भरत होते. मात्र, ही रक्कम दुकानदाराच्या खात्यात जमा न होता संबंधित तरुणाच्या खात्यात जात होती. सुरुवातीला दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नेटवर्कची समस्या असल्याचे वाटले. मात्र, वारंवार व्यवहार करूनही पैसे खात्यात जमा न झाल्याने त्यांना संशय आला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणाचे कृत्य कैद

दुकानदाराने QR कोड तपासला असता मूळ कोडवर दुसराच QR कोड चिकटवल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात लाल शर्ट घातलेला तरुण QR कोड बदलताना दिसत असल्याची माहिती आहे. या तरुणाने दुकानातील दोन ठिकाणी स्वतःचा QR कोड लावल्याचेही दुकानदाराने सांगितले.

किमान तीन ते चार व्यवहारांची रक्कम आपल्या खात्यात जमा झाली नसल्याचे ओमी सिंधी यांनी सांगितले. दुकानातील गर्दीमुळे सुरुवातीला ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. त्यांच्या भाच्याने पैसे जमा न झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी चौकशी केली.

पोलिसांकडून गुन्हा दाखल; सायबर सेलची मदत

या प्रकरणी ओमी सिंधी यांनी नगर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे सादर केले आहे. शहर पोलीस ठाण्याचे सीओ योगेंद्र सिंह यांनी तक्रार प्राप्त झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, निगराणी पथक आणि सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here