Home क्राईम Mumbai Crime News : कांदिवलीत ड्रग्ज माफिया टिपूच्या टोळीवर मोक्का; तीन साथीदारांना अटक, 17 गुन्ह्यांची नोंद

Mumbai Crime News : कांदिवलीत ड्रग्ज माफिया टिपूच्या टोळीवर मोक्का; तीन साथीदारांना अटक, 17 गुन्ह्यांची नोंद

0
Mumbai Crime News : कांदिवलीत ड्रग्ज माफिया टिपूच्या टोळीवर मोक्का; तीन साथीदारांना अटक, 17 गुन्ह्यांची नोंद
कांदिवलीत ड्रग्ज माफिया टिपूच्या टोळीवर मोक्का; तीन साथीदारांना अटक, 17 गुन्ह्यांची नोंद (Photo Google)

Mumbai Crime News: मुंबईतील कांदिवली पूर्वेकडील समतानगर आणि कुरार परिसरात कथित गुन्हेगारी कारवायांमुळे दहशत निर्माण केल्याचा आरोप असलेल्या इम्तियाज हुसेन सय्यद उर्फ टिपू याच्या टोळीवर मुंबई पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. समतानगर पोलिसांनी या प्रकरणात टोळीतील तीन साथीदारांना अटक केली आहे. राज रवी शर्मा उर्फ कालू, जितेश राजपूत आणि राधा राजपूत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/12/son-opens-fire-on-father-and-brother-over-a-property-dispute-stir-in-titwala/

मुख्य आरोपी टिपू हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात यापूर्वी 17 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमली पदार्थांची विक्री आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

12 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजता कांदिवली पूर्वेकडील हनुमाननगर परिसरात अनमोल डेअरीजवळ मारहाणीची घटना घडली होती. बिर्याणी सेंटरमधील किरकोळ वादातून आरोपींनी काही तरुणांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यावेळी चाकूचा धाक दाखवून दगड आणि लाकडी बांबूच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, टिपूविरोधात दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, महिलांविरोधातील गुन्हे आणि अमली पदार्थांची विक्री यांसारखे 17 गुन्हे नोंद आहेत. अटक करण्यात आलेल्या राज शर्मा उर्फ कालू याच्याविरोधात 7, तर जितेश आणि राधा राजपूत यांच्याविरोधात प्रत्येकी 2 गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे.

या टोळीच्या कथित संघटित गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (MCOCA) कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) अंतर्गत कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here