Home ब्रेकिंग न्यूज Water Wastage : पाण्याचा अपव्यय: आयुक्तांचे आदेश धाब्यावर, रस्त्यांवर मोटरद्वारे पाण्याचा वापर करून धुतली जातात वाहने

Water Wastage : पाण्याचा अपव्यय: आयुक्तांचे आदेश धाब्यावर, रस्त्यांवर मोटरद्वारे पाण्याचा वापर करून धुतली जातात वाहने

0
Water Wastage : पाण्याचा अपव्यय: आयुक्तांचे आदेश धाब्यावर, रस्त्यांवर मोटरद्वारे पाण्याचा वापर करून धुतली जातात वाहने

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

मुंबईतील पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर पिण्याचा पाण्याचा अपव्यय होवून तसेच पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी इतर पाण्याचा वापर करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या आहे. त्याअंतर्गत जागोजागी रस्त्यांवर वाहने धुण्याची सर्विस सेंटर उभी आहे, त्यावर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिल्यांनतरही मुंबईत आजही अशाप्रकारची बेसुमार पाण्याचा वापर करून वाहने धुणारी सर्विस सेंटर सुरुच आहेत. या सर्विस सेंटरमध्ये महापालिकेच्या पिण्याचाच पाण्याचा वापर होत असून काही ठिकाणी फक्तच टँकरच्या पाण्याचा वापर होत आहे. परंतु आयुक्तांच्या निर्देशानंतरही या सर्विस सेंटरवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या एकाही सहायक आयुक्तांचे हात धजावत नाही. त्यामुळे आयुक्तांचे आदेशही यामाध्यमातून धाब्यावर मारले जात आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/12/centre-allocates-%e2%82%b962370-crore-for-the-rabi-season/

मुंबईत यंदा पाण्याचा साठा मुबलक असला तरी काही जिल्ह्यांमधील गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ पसरला आहे. त्यातच भविष्यात अल निनोचा प्रभाव असण्याची दाट शक्यता असल्याने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने केले जात आहे. त्यामुळे मुंबईतील पाणी समस्येबाबत चिंता व्यक्त करत असताना नगरसेवकांनी रस्त्यांवर वाहने धुणाऱ्या सर्विस सेंटरचा उल्लेख करत त्याठिकाणी दरदिवशी हजारो लिटर पाणी वापरले जात असल्याचे सांगितले. तसेच अशाप्रकारच्या सर्विस सेंटरवर कारवाई करून त्वरीत ती बंद करण्याची मागणी केली होती. त्यांनतर खुद्द महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पिण्याचा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अशाप्रकारे सर्विस सेंटरच्या माध्यमातून वाहने धुण्यासाठी जर पाण्याचा अधिक वापर होत असेल तर त्याची तपासणी केली जावी आणि त्यावर कारवाई केली जावी अशा सूचना केल्या होत्या.

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी कुर्ला परिसरात अशाप्रकारे रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली सर्विस सेंटर उभी असून त्यामध्ये वाहने धुण्याच्या नावाखाली हजारो लिटर पाण्याचा वापर केला जातो. यामध्ये पिण्याचाच पाण्याचा वापर केला जात असल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत बोलतांना सांगितले होते. त्यानंतर संपूर्ण मुंबईत हीच परिस्थिती आहे. गोरेगाव संतोष नगर येथील फिल्मसिटी रोडवर सॅटेलाईट सोसायटीबाहेरच अशाप्रकारे वाहने पाण्याने धुतली जात आहेत. तर शिवडीतही अशाचप्रकारे वाहने पाण्याने धुण्याची सर्विस सेंटर खुली आहेत. त्यामुळे एका बाजुला नागरिकांना पाण्याचा बचत करा म्हणून आवाहन केले जाते आणि दुसरीकडे वाहने पाण्याने धुतली जात आहे, यामध्ये महापालिकेच्या पाण्याचा वापर होत असताना त्याठिकाणी अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत आहे.

भाजपचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली असून ते म्हणाले की, माझ्या माहितीमध्ये शिवडीमध्ये आजही वाहने मोटरद्वारे पाण्याचा वापर करून धुतली जातात. तसेच वरळी कोळीवाडा रस्त्याकडे जाणाऱ्या भागांतही अशाचप्रकारे मोटर पंपांचा वापर करून वाहने धुतली जाते. जर महापालिका आयुक्तांचे आदेश असतील की तपासणी करा आणि कारवाई करा म्हणून तर आतापर्यंत या अधिकाऱ्यांनी किती पाण्याने वाहने धुणाऱ्या किती सर्विस सेंटरवर कारवाई केली ते तरी सांगावे. मुळात अधिकाऱ्यांना बाहेर पडून पाहणी करण्याची हिंमत नाही किंवा त्यांचा याला छुपा पाठिंबा आहे. त्यांचे हितसंबंध यामध्ये गुंतलेले असल्याने ते यावर कारवाई करत नाही. भविष्यातील पाणी समस्या विचारात घेता, आज प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. जर महापालिका आयुक्तांनी आवाहन केले असेल तर त्याचे पालन जनतेसोबत अधिकाऱ्यांनीही करणे तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे जे अधिकारी अशाप्रकारे आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्या महापालिका प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी धुरी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here