Home ताज्या घडामोडी स्पाइसजेट कंपनी आर्थिक संकटात? दररोज 15 ते 20 उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल!

स्पाइसजेट कंपनी आर्थिक संकटात? दररोज 15 ते 20 उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल!

0
स्पाइसजेट कंपनी आर्थिक संकटात? दररोज 15 ते 20 उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल!
स्पाइसजेट कंपनी आर्थिक संकटात? दररोज 15 ते 20 उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल! फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई: ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये विमानाने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. देशातील लोकप्रिय एअरलाइन असलेल्या ‘स्पाइसजेट’च्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आर्थिक संकट आणि विमानांच्या प्रचंड कमतरतेमुळे एअरलाइनला दररोज 15 ते 20 उड्डाणे रद्द करावे लागत आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, स्पाईसजेट कंपनीकडे सध्याच्या घडीला फक्त 12 विमानं शिल्लक राहिली आहेत. विमानं कमी झाल्यामुळे आणि आर्थिक समस्यांमुळे याचा थेट फटका विमान प्रवाशांना बसत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/11/find-out-when-salaries-in-line-with-the-8th-pay-commission-will-be-credited-to-the-accounts-of-central-government-employees-get-the-detailed-information-here/

दिवसाला 65 विमानांचे नियोजित उड्डाणे करणारी विमान कंपनी सध्याच्या घडीला दररोज जेमतेम 15 ते 20 उड्डाणेच करीत आहे. तासभरच्या वेळानंतर स्पाईसजेटकडून अचानक विमानं रद्द केली जात आहेत. यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात असून कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल आणि कामकाज चालू ठेवण्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. स्पाइसजेट एअरलाईन समोर, मोठ्या प्रमाणावार पैसे देणे बाकी असल्याचे म्हटले जात आहे. स्पाईसजेट कंपनीला विमान भाडे तत्त्वावर देणार्‍या कंपन्या, एअरपोर्ट ऑपरेटर, तेल कंपन्या आणि ग्राउंड हँडलिंग एजन्सींचे पैसे देणे बाकी आहे. पैसे न भरल्यामुळे तीन विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. शिवाय, ती सर्व विमाने वापरण्यायोग्य नसल्यामुळे म्हणून ते वापरले जात नाही. असे वृत्त आहे की, कंपनी आधीच अनेक अत्यावश्यक सेवांसाठी पैसे देत आहे. याचा परिणाम तिच्या दैनंदिन विमान उड्डाणांवरही होत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/11/big-news-terrorist-attack-on-a-crpf-post-in-kulgam-jammu-and-kashmir-two-soldiers-injured/

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेटच्या आर्थिक परिस्थितीचा फटका कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, जून 2026 पासून ते आतापर्यंतचे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. सततच्या आर्थिक दबावामुळे एअरलाइनला आपले कामकाज सामान्यपणे चालू ठेवणे अधिकाधिक कठीण होत आहे. कमी झालेल्या फ्लाइट्सच्या संख्येमुळे आणि फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे, स्पाइसजेटची तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या फ्लाइटची स्थिती तपासावी. शिवाय, फ्लाइट रद्द झाल्यास, त्यांनी एअरलाइनकडून रिबुकिंग आणि रिफंडबद्दल वेळेवर माहिती घेण्याचे आवाहन स्पाईसजेटकडून केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here