भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने गर्लफ्रेंड समरीन कौरसोबत साखरपुडा केला आहे. भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान ही आनंदाची बातमी समोर आली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत दोघांनीही आपल्या आयुष्यातील या खास क्षणाची माहिती चाहत्यांना दिली. (Photo: samreenkaur__ Instagram)अर्शदीप सिंगने समरीन कौरला अगदी खास अंदाजात प्रपोज केलं. गुडघ्यावर बसून अंगठी घालत तिला आयुष्यभराची साथ देण्याची मागणी करतानाचा त्याचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (Photo: samreenkaur__ Instagram)भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट मालिकेदरम्यान अर्शदीपने न्यूझीलंडमध्येच आपल्या आयुष्यातील हा खास क्षण साजरा केला. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत 11 नोव्हेंबर 2026 ही तारीख आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात म्हणून जाहीर केली. (Photo: samreenkaur__ Instagram)अर्शदीप आणि समरीन यांच्या नात्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. यापूर्वीही दोघांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जुलै महिन्यात अर्शदीपने समरीनसोबतचे फोटो शेअर करत आपल्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले होते. (Photo: samreenkaur__ Instagram)समरीन कौर ही मनोरंजन आणि ग्लॅमर विश्वातील उगवती अभिनेत्री आहे. तिने पंजाबी म्युझिक व्हिडिओंसोबतच रणवीर सिंगच्या ‘83’ या चित्रपटातही छोटी भूमिका साकारली आहे. तसेच ‘नेल पॉलिश’ या चित्रपटातही ती झळकली होती. मिस इंडिया जम्मू-काश्मीर स्पर्धेशीही तिचे नाव जोडले गेले आहे. (Photo: samreenkaur__ Instagram)