नवी दिल्ली: देशांतर्गत परकीय चलन विनिमय बाजारात (फॉरेक्स मार्केट) आज भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत अत्यंत जोरदार मजबुती नोंदवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. देशांतर्गत शेअर बाजारातील सलग तेजी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा यामुळे भारतीय चलनात ही घसघशीत वाढ पाहायला मिळत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर भारतीय रुपया मागील बंद भाव 93.9400 रुपयांच्या तुलनेत थेट 0.2525 रुपये म्हणजेच सुमारे 0.27 टक्क्यांनी मजबूत होऊन प्रति डॉलर 93.6875 रुपयांच्या उच्च पातळीवर व्यवहार करताना दिसून आला.
आज सकाळी आंतरबँक परकीय चलन बाजारात भारतीय रुपया तब्बल 21 पैशांच्या मजबूत वाढीसह प्रति डॉलर 93.73 रुपयांच्या आधारावर खुला झाला होता. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळ आयातदारांकडून वाढलेल्या डॉलरच्या मागणीमुळे रुपया काही प्रमाणाणात घसरून 93.8825 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला होता. मात्र, त्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग बाजारात मोठ्या प्रमाणावर झालेली डॉलरची आवक आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण यामुळे रुपयाने अत्यंत दमदार पुनरागमन केले. परिणामी, रुपया मजबूत होत दिवसातील 93.67 रुपयांच्या उच्चांकी पातळीपर्यंत झेपावला.
https://www.prahaar.in/2026/11/11/8th-pay-commission-big-benefits-before-retirement-know-arrears-and-pension-rules/