Home ताज्या घडामोडी Mumbai Traffic News: छठ पूजेनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; घर सोडण्यापूर्वी नक्की वाचा महत्त्वाचे नियम

Mumbai Traffic News: छठ पूजेनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; घर सोडण्यापूर्वी नक्की वाचा महत्त्वाचे नियम

0
Mumbai Traffic News: छठ पूजेनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; घर सोडण्यापूर्वी नक्की वाचा महत्त्वाचे नियम
छठ पूजेनिमित्त मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल; घर सोडण्यापूर्वी नक्की वाचा महत्त्वाचे नियम फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: मुंबई महानगर पालिकेकडून मुंबई शहरामध्ये यंदा छठ पूजेनिमित्त जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असताना मुंबईमध्ये लाखो उत्तर भारतीय नागरिक मुंबईतील वेगवेगळ्या चौपाट्यांवर छट पूजा करणार आहे. मुंबईतील चौपाट्यांवरील तयारी शेवटच्या टप्प्यामध्ये आली असून मुंबई वाहतूक पोलिसांनी या पूजेनिमित्त शहरातील वाहतूकीच्या रस्त्यांमध्ये बदल केला आहे. जुहू चौपाटीवर लाखो उत्तर भारतीय भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. भाविकांची गर्दी आणि कायदा- सुव्यवस्था लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांच्या पश्चिम उपनगर विभागाने 15 आणि 16 नोव्हेंबर 2026 रोजी जुहू चौपाटी परिसरामध्ये विशेष वाहतूक नियम व निर्बंध लागू केले आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/11/no-flights-from-mumbai-will-be-shifted-to-navi-mumbai-chief-minister-devendra-fadnavis-letter-sent-to-the-central-government-regarding-the-redevelopment-of-terminal-1/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे निर्बंध 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सांताक्रूझ वाहतूक विभागाच्या अंतर्गत लागू राहणार आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पार्किंगवर बंदी असलेले रस्ते

जुहू चौपाटीच्या आसपासच्या भागात वाहनांना पार्क करण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे. छट पूजेदरम्यान खालील रस्त्यांवर पार्किंगवर बंदी घालण्यात आलेली आहे.

  • जुहू तारा रोड (दोन्ही बाजू)
  • ए. बी. नायर रोड
  • व्ही. एम. रोड
  • जुहू चर्च रोड
  • बिर्ला लेन

https://www.prahaar.in/2026/11/11/shegaon-kachori-and-puneri-misal-to-be-available-at-the-mantralaya-canteen-54-new-food-items-added-to-the-menu/

वाहतुकीसाठी आणि वाहतूक वळणासाठी बंद

रस्ते बंद- सांताक्रूझ पोलीस स्टेशन जंक्शन ते जुहू चौपाटी आणि टुलिप स्टार हॉटेल जंक्शन ते जुहू चौपाटी दरम्यानचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. केवळ पोलीस आणि आपात्कालीन सेवांच्या वाहनांना नो एन्ट्रीच्या नियमांमधून सूट देण्यात आली आहे.

वन-वे मार्ग: ए. बी. नायर रोड ते चर्च रोडपासून बलराज साहनी मार्गाच्या दिशेने एकेरी वाहतूक असणार आहे.

यू- टर्न बंद: हॉटेल महाराजा भोगसमोरील यू-टर्न बंद करण्यात आला आहे. टुलिप स्टार हॉटेलमार्गे जुहू कोळीवाड्यात जाणाऱ्या वाहनचालकांनी छट पूजेच्या दिवशी जुहू कोळीवाडा जंक्शनवरील यू- टर्नचा वापर करावा लागणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/11/kedarnath-yatra-concludes-19-22-lakh-pilgrims-offered-prayers-this-year-temple-doors-closed-amidst-chants-of-jai-baba-kedar/

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग

  • लिंक रोडवरून येणाऱ्या वाहनांना सांताक्रूझ पोलीस स्टेशन जंक्शन येथे उजवे वळण घेऊन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक जंक्शनवरून डावे वळण घेत एस. व्ही. रोडवरून आपल्या इच्छित स्थळी जाता येणार आहे.
  • टुलिप स्टार हॉटेलकडून येणारी वाहने व्ही. एम. रोडने वळवण्यात आली आहेत.
  • इतर पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालक जुहू चर्च रोड किंवा अल्फ्रेडो क्रियाडो रोडमार्गे एन. एस. रोड क्रमांक 13 चा वापर करू शकतात.

मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्व नागरिकांना आणि वाहनचालकांनी वाहतूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे, नियमांचे पालन करण्याचे सोबतच, गैरसोळ टाळावी म्हणून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here