Home ब्रेकिंग न्यूज Pratiksha Nagar Fire : वडाळ्यात 2 ते 4 झोपड्यांना आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Pratiksha Nagar Fire : वडाळ्यात 2 ते 4 झोपड्यांना आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

0
Pratiksha Nagar Fire : वडाळ्यात 2 ते 4 झोपड्यांना आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न
वडाळ्यात 2 ते 4 झोपड्यांना आग; अग्निशमन दलाकडून घटनास्थळी धाव (Photo : Video Grab)

Mumbai News: मुंबईतील वडाळा येथील प्रतीक्षा नगर पोलीस क्वार्टर्सजवळ मंगळवारी रात्री आगीची घटना घडली. माला गार्डन परिसरातील एल-5 इमारतीजवळ लागलेल्या आगीत तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटांमुळे परिसरात घबराट पसरली. या घटनेत अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रात्री 10.51 वाजता आगीची माहिती

मंगळवारी रात्री 10.51 वाजता सीपी कंट्रोल रूमला प्रतीक्षा नगरमधील माला गार्डनजवळ 2 ते 4 झोपड्यांना आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने रात्री 11.15 वाजता आगीला लेव्हल-1 चा कॉल घोषित केला.

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, वडाळा टीटी पोलीस, बेस्ट, 108 रुग्णवाहिका आणि मुंबई महापालिकेचे वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी

या घटनेत अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाल्याचे समोर आले आहे. त्याला तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरुवातीला रात्री 11.41 वाजता मुंबई महापालिकेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते. मात्र, त्यानंतर अग्निशमन कर्मचाऱ्याच्या जखमी होण्याची माहिती समोर आली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

जीवितहानीची नोंद नाही

प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आग नेमकी कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

स्फोटामुळे परिसरात घबराट

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, सिलेंडरचा स्फोट इतका जोरदार होता की जवळच्या इमारतींच्या खिडक्याही हादरल्या. स्फोटांचे आवाज ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत किती आर्थिक नुकसान झाले, याचीही माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here