Mumbai News: मुंबईतील वडाळा येथील प्रतीक्षा नगर परिसरात आगीची घटना घडली. माला गार्डनजवळील सुमारे 2 ते 4 झोपड्यांना आग लागल्याची माहिती 10 नोव्हेंबर रोजी रात्री 10.51 वाजता सीपी कंट्रोल रूमला मिळाली.
अग्निशमन दलाकडून लेव्हल-1 चा कॉल
माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने रात्री 11.15 वाजता या घटनेला लेव्हल-1 आगीचा कॉल घोषित केला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल (MFB), पोलीस, बेस्ट, 108 रुग्णवाहिका आणि मुंबई महापालिकेचे संबंधित वॉर्ड कर्मचारी अशा यंत्रणा तैनात करण्यात आल्या.
View this post on Instagram
जीवितहानीची नोंद नाही
प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आग नेमकी कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.