ठाणे: ठाणे जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार आणि जिल्हा मुख्यालयाचे असलेले लांब अंतर यामुळे कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ या चार तालुक्यांतील नागरिकांना कागदपत्रे किंवा इतर लहान-सहान शासकीय कामांसाठी वारंवार ठाणे येथे फेऱ्या माराव्या लागत होत्या. नागरिकांची हीच मोठी अडचण दूर करण्यासाठी राज्य शासनाने अखेर कल्याणमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/hit-and-run-in-andheri-speeding-car-rams-into-a-two-wheeler-banker-couple-injured-driver-absconding/
नवीन प्रशासकीय रचना कशी असेल?
या नवीन रचनेनुसार कल्याण, उल्हासनगर, मुरबाड आणि अंबरनाथ हे चार तालुके आता थेट कल्याणच्या नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेत येतील. दुसरीकडे, ठाणे, भिवंडी आणि शहापूर हे तीन तालुके पूर्वीप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत राहतील.
त्वरित अंमलबजावणीचे आदेश
कल्याण येथील या नवीन कार्यालयासाठी शासन स्तरावरून ‘अपर जिल्हाधिकारी’ आणि ‘तहसीलदार’ ही पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचे कामकाज लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी प्रशासनाला तातडीने तात्पुरती जागा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल पुढील १५ दिवसांच्या आत शासनाला सादर करण्यास सांगण्यात आले आहे, ज्यामुळे या कार्यालing चे कामकाज लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/panvel-vasai-suburban-railway-corridor-69-23-km-12710-crore-direct-local-train-click-here-and-read-full-article/
या निर्णयामुळे कल्याण परिसरातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पार पडण्यास मदत होईल.