Home ताज्या घडामोडी Ramayana Movie Collection: 4,000कोटींचा ‘रामायण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट? 3 दिवसांची कमाई पाहा

Ramayana Movie Collection: 4,000कोटींचा ‘रामायण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट? 3 दिवसांची कमाई पाहा

0
Ramayana Movie Collection: 4,000कोटींचा ‘रामायण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट? 3 दिवसांची कमाई पाहा
Ramayana Movie

Ramayana Movie Collection: बहुचर्चित नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली असून शनिवारी पहिल्या दिवसाच्या तुलनेत अधिक कमाई झाली. तिसऱ्या दिवशी, ‘रामायणा’ने भारतात 69.80 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली असून, ज्यामुळे चित्रपटाची कमाई 182.70 कोटी रुपयांवर पोहोचली, तर एकूण कमाई 218.25 कोटी रुपये झाली.

रणबीर कपूरने प्रभू श्रीराम, साई पल्लवी सीता तर यशने रावणाची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. रामायण हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्याचबरोबर बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडेही चर्चेचा विषय ठरत आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/08/kanpur-hit-and-run-case-thar-vehicle-hits-a-young-man-riding-a-scooter-the-youth-dies-on-the-spot/

चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 64.85 कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारी चित्रपटाने 48.05 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत काहीशी घट झालेली पाहायला मिळाले.त्यानंतर छोटी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

तिसऱ्या दिवशी, ‘रामायणा‘ने भारतात 69.80 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली, ज्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई 182.70 कोटी रुपयांवर पोहोचली, तर एकूण कमाई 218.25 कोटी रुपये झाली. शुक्रवारी, मात्र कमाईत किंचित घट दिसून आली. परंतु, चित्रपटासाठी दिवाळीचा वीकेंड दमदार असेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. बिग बजेट 4,000 कोटी रुपयांमध्ये बनलेला ‘रामायण’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट मानला जातो.

तिसऱ्या दिवशी हिंदी कार्यक्रमांमधून सर्वाधिक योगदान मिळून, 19,927 शोजमधून एकूण कमाईत 53 कोटी रुपयांची भर पडली. त्यापाठोपाठ कन्नडमधील 907  शोमधून 6.30 कोटी रुपये, तेलगूमधील 1586  शोमधून 6.00 कोटी रुपये आणि मल्याळममधील 593 शोमधून 2.00 कोटी रुपये मिळाले. दरम्यान, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी परदेशात 60.00 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे आतापर्यंतची त्याची एकूण परदेशी कमाई 157.25  कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 375.50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here