Home ताज्या घडामोडी Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक

0
Pune Metro: पुणे मेट्रोने दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा; 8 नोव्हेंबरला शेवटची मेट्रो केव्हा सुटणार? वाचा वेळापत्रक
पुणे मेट्रोचा दिवाळीनिमित्त पुणेकरांना मोठा दिलासा फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

पुणे: पुणे मेट्रोने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘पुणे मेट्रो’ने घेतलेला निर्णय आता त्यांनी मागे घेतला आहे. पुणेकरांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गैरसोय होऊ नये किंवा नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, या दृष्टीने ‘महा मेट्रो’ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रोने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दररोजच्या प्रमाणे मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रोच्या ह्या निर्णयामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कशापद्धतीने पुणे मेट्रो चालवली जाणार आहे, जाणून घेऊया…

https://www.prahaar.in/2026/11/07/nagpur-metro-diwali-lakshmi-pujan-8th-november-timing-update/

येत्या रविवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या संचालनामध्ये बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो रविवारच्या दिवशी नियमित वेळेमध्ये चालू राहणार असून मेट्रोच्या दोन्हीही मार्गिका चालू राहणार असल्याची माहिती महामेट्रोने पुणेकरांना दिली आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत पुणे मेट्रो सुरू राहणार आहे. पुण्याच्या मेट्रोचे ‘महा मेट्रो’कडून संचलन केले जाते. पुणे मेट्रोने यापूर्वी दोनदा वेळेमध्ये बदल करण्यात आल्यामुळे पुणेकरांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. काही तासांपूर्वीच पुण्याच्या ‘महा मेट्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी पुणे मेट्रो आपल्या दररोजच्या नियमित वेळेप्रमाणे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/07/thane-fire-breaks-out-in-a-locked-unit-within-a-dilapidated-building-in-uthalsar/

दरम्यान, सुरूवातीला पुणे मेट्रो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण पुणेकरांनी या निर्णयाला विरोध दर्शवत, वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दुसर्‍यांदा पुणे मेट्रोने दोन तासांचा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला होता. सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत पुणे मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुन्हा एकदा शनिवारी दुपारी पुणे मेट्रोने निर्णय बदलून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रो नियमित वेळेप्रमाणे चालू ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारपासून (9 नोव्हेंबर) पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत कायम सुरू राहणार आहे. शिवाय, पुणे मेट्रोने मेट्रो मार्गांजवळ, ओव्हरहेड वायरीजवळ आणि वीज वाहिन्यांजवळ फटाके वाजवू नयेत, असे आवाहनही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here